स्वाभिमानी शेतकरी संघटना

राज्यसभेसाठी आज महायुतीचं विचारमंथन, जागावाटपाचं सूत्र ठरणार?

सेना भाजप, आरपीआय आठवले गट आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी सेतकरी संघटना यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत रंगशारदा इथं संध्याकाळी होत आहे.

Jan 14, 2014, 09:47 AM IST

‘आप’नं फेटाळला ‘स्वाभिमानी’चा प्रस्ताव!

शेतकऱ्यांसंदर्भातल्या आमच्या अटी मान्य केल्या तर ‘आप’सोबत आघाडी करणार असल्याचं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं होतं. मात्र अटींवर आधारीत राजकारण ‘आप’च्या तत्वात बसत नसल्याचं सांगून राजू शेट्टींचा सशर्थ आघाडीचा प्रस्ताव आम आदमी पार्टीनं फेटाळून लावलाय.

Jan 1, 2014, 07:22 PM IST

उसाला २६५० रुपये पहिली उचल घ्यायला मान्यता

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी एक पाऊल पाठिमागं घेत २६५० रुपये उसाला पहिली उचल घ्यायला मान्यता दिली असली तरी कोल्हापुरात सकाळपासून ठिकठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं.

Nov 29, 2013, 07:49 PM IST

शिवसैनिकांना त्रास नको... ऊस आंदोलकांचा 'रास्ता रोको' स्थगित

‘ऊस दराच्या आंदोलनाचं स्वरुप आम्ही बदलतोय, ऊस आंदोलक रास्ता रोको करणार नाही’ अशी ग्वाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलीय.

Nov 17, 2012, 03:33 PM IST

राजू शेट्टींना जामीन मंजूर पण...

ऊसदर आंदोलनप्रकरणी खासदार राजू शेट्टी यांना बारामती जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांनी जामीन देण्यात आलाय. पण, यावेळी न्यायालयानं शेट्टी यांनी तीन तालुक्यात प्रवेश बंदीही केलीय.

Nov 16, 2012, 01:28 PM IST

`स्वाभिमानी`नं रोखल्या शिवसैनिकांच्या गाड्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस दरवाढीसाठी सुरू केलेलं आंदोलनही अजून थंड झालेलं नाही. या आंदोलनाचा फटका शिवसैनिकांना बसू नये, यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आवाहन केलंय.

Nov 15, 2012, 07:19 PM IST

ऊस पेटला, पोलिसांची जीपच पेटवली

ऊस दरवाढीसाठी करण्यात आलेले आंदोलन अधिकच पेटत आहे. आज कोल्हापूर जवळील दिंडनेर्ली फाट्याजवळ पोलिसांची जीप आंदोलनकर्त्या जमावाने पेटविली. त्यामुळे ऊस आंदोलन भडकण्याची परिस्थितीवरून शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, सुरू करण्यात आलेली एसटी सेवा पुन्हा काही तासाच बंद करण्यात आलीय.

Nov 14, 2012, 12:24 PM IST

प. महाराष्ट्रातील बंद एसटी सेवा सुरु

ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनानंतर बंद ठेवण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्रातली एसटी सेवा आज सुरु करण्यात आली.

Nov 14, 2012, 10:35 AM IST

खासदार राजू शेट्टींची दिवाळी जेलमध्ये

ऊसाला ३००० रूपये दर देण्यासाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. आंदोलन करणाऱ्यांनी जाळपोळ आणि तोडफोड केल्याने पोलिसांनी गोळीबार केला. त्यातच ऊसदरासाठी आंदोलन सुरु करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, सतीश काकडे यांच्यासह इतर सहा जणांना चौदा दिवसांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, देण्यात आली. त्यामुळे त्यांची दिवाळी जेलमध्ये साजरी होत आहे.

Nov 13, 2012, 09:24 AM IST

मालेगावात पुन्हा 'कांदोलन'

कांदा दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरु केलेलं आंदोलनं आता चांगलचं पेटलंय. खासदार राजू शेट्टींसह ३ ते ४ हजार शेतकऱ्यांना अटक करण्यात आलीय. मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनकर्ते जमलेत.

Apr 17, 2012, 08:09 PM IST

वाद सोयाबीन आणि कापूस परिषदेचा

झी २४ तास वेब टीम, बुलढाणा

 

बुलढाण्यात २७ नोव्हेंबरला सोयाबीन आणि कापूस परिषद होणारच असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय. पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचं कारण दाखवत या परिषदेला परवानगी नाकारली आहे.

 

Nov 25, 2011, 08:38 AM IST

अखेर ऊस दराचा तिढा सुटला

अखेर ऊसदराचा तिढा सुटला, कोल्हापूर विभागात 2050 रू. पुणे विभागासाठी 1850 तर उर्वरित महाराष्ट्रासाठी 1800 रू. दर निश्चित करण्यात आला आहे. लेखी पत्र मिळाल्यानंतर उपोषण सोडणार असल्याचं शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी सांगितलं आहे.

Nov 11, 2011, 03:12 PM IST