अडवाणींनी राजीनामा घेतला मागे
नाराजीनाम्यानंतर अडवाणींनी त्यांचा राजीनामा मागे घेतलाय. भाजपमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेलं महाभारत अखेर संपलंय. लालकृष्ण अडवाणींनी राजीनामा मागे घेतलाय.
Jun 11, 2013, 07:00 PM ISTअडवाणींची नरेंद्र मोदींनी मागितली माफी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीची सर्व सूत्र राजनाथसिंग यांनी दिल्यानंतरच दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आणि भाजपमध्ये भूकंप घडवून आणला. त्यानंतर नाट्यमय घडामोडींना वेग आला. मोदी यांनी आपले राजकीय गुरू अडवाणी यांनी माफी मागितली.
Jun 11, 2013, 12:20 PM ISTअडवाणींचा राजीनामा नामंजूर
भाजपच्या संसदीय बोर्डानं अडवाणींचा राजीनामा फेटाळलाय. कुठल्याही परिस्थितीत अडवाणींचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंहांनी स्पष्ट केलंय.
Jun 10, 2013, 11:44 PM ISTराजनाथसिंह यांना अडवाणींनींनी लिहिलेले पत्र
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय. तसे पत्र अध्यक्ष राजनाथ सिंग यांना दिले. हे पत्र प्रसिद्धी माध्यमांच्या हाती आलेय.
Jun 10, 2013, 03:53 PM ISTअडवाणी यांचा भाजप पदांचा राजीनामा
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय. तसे पत्र अध्यक्ष राजनाथ सिंग यांना दिले. हे पत्र प्रसिद्धी माध्यमांच्या हाती आलेय.
Jun 10, 2013, 02:25 PM ISTमोदी समर्थकांचा अडवाणींवर हल्लाबोल!
लालकृष्ण अडवाणींच्या घराबाहेर मोदिंच्या समर्थनार्थ निदर्शनं करण्यात आली. नरेंद्र मोदी आर्मी आणि हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही निदर्शनं केली.
Jun 8, 2013, 09:39 PM ISTलालकृष्ण आडवाणींचा भाजपला घरचा आहेर
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. देशातील जनतेमध्ये भाजपच्या बाबतीत काहीसं अविश्वासाचं वातावरण असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Mar 10, 2013, 08:43 AM ISTठाकरे कुटुंबाने एकत्र येणाचे अडवाणींचे आवाहन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर तरी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का, ही चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही नेमक्या याच विषयाला हात घातलाय. ठाकरे कुटुंबाने एकत्र यावे असं आवाहन अडवाणी यांनी केलंय.
Nov 28, 2012, 12:31 PM IST`एनडीए`ची भारत बंदची घोषणा...
डिझेलची दरवाढ आणि ‘एफडीआय’च्याविरोधात एनडीएनं २० सप्टेंबरला भारत बंद पुकारलाय. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी याविषयीची घोषणा केली. तसचं पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
Sep 15, 2012, 07:38 PM ISTयुपीएचं सरकार अनौरसच!- बाळासाहेब
युपीए-२ सरकार अनौरसआहे, हे विधान केल्याबद्दल लालकृष्ण अडवाणींवर काँग्रेसने टीकेची झोड उठवली. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अडवणींच्या विधानावर आपल्या ठाकरी शैलीत पाठिंबाच दिला आहे. अडवाणींच्या तोंडून चुकीने का होईना सत्य बाहेर पडलं, असं बाळासाहेबांनी ‘सामना’मध्ये म्हटलं आहे.
Aug 11, 2012, 05:38 PM IST...आणि सोनिया गांधी भडकल्या
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संतापाचा पारा आज लोकसभेत पाहायला मिळाला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी अडवाणी यांनी 'यूपीए -2 सरकार अवैध' असल्याचे म्हटले आणि शांत वाटणाऱ्या सोनिया गांधी यांनी आपला वृद्रावतार दाखवला. काँग्रेसने प्रती हल्लाबोल केल्यानंतर अडवाणी यांनी आपले वक्तव्य मागे घेतले.
Aug 9, 2012, 01:48 AM ISTमतांसाठी घुसखोरीला उत्तेजन – अडवाणी
‘आसाममधला वाद हिंदू-मुस्लिमचा असा जातीयवादी नाही तर आसाममध्ये घुसखोरीमुळेच हिंसाचार सुरु आहे. आणि मतांसाठी या घुसखोरीला उत्तेजन मिळत असल्याचा’ घणाघाती आरोप अडवाणींनी सरकारवर केलाय. संसदेचं पावसाळी अधिवेशनात ते बोलत होते. अडवाणींच्या या आरोपांमुळे सोनिया गांधी मात्र चांगल्याच तापल्या.
Aug 9, 2012, 01:26 AM IST‘मातोश्रीवर येऊन जिगर घेऊन जा...’
‘मित्रा, हिंमत हरू नकोस! असं म्हणत अडवाणींना धीर देतानाच ‘‘मातोश्री’वर येऊन आमच्याकडून हिंमत व जिगर कामापुरती घेऊन जा’ असा उपरोधिक टोलाही बाळासाहेबांनी लालकृष्ण अडवाणींना लगावलाय.
Aug 7, 2012, 11:28 AM IST'पुढचा पंतप्रधान काँग्रेस-भाजपचा नाही' - अडवाणी
लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये काँग्रेस आणि भाजपला बहुमत मिळणं अशक्य असल्याचं भाकित वर्तवलंय खुद्द भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी... राजकारणात अनेक वर्ष घालवलेल्या अनुभवी अडवाणींनी आपले विचार मांडण्यासाठी ब्लॉगचा आधार घेतलाय. २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतरही भाजपचा पंतप्रधान होणार नाही, असंही अडवाणींनी या ब्लॉगमध्ये म्हटलंय.
Aug 5, 2012, 07:17 PM ISTभाजपचं ‘वेट अॅन्ड वॉच’
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठक आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत कोणत्याही नावावर ठोस निर्णय झाला नसल्याचं, अडवाणी यांनी सांगितलंय.
Jun 15, 2012, 03:53 PM IST