रेल्वे प्रवासी

हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा खोळंबा, चेंबूर येथे रुळाला तडे

हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना आज सकाळी पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागला. चेंबूर येथे रुळाला तडे गेल्याने वाहतूनक ठप्प पडली होती. दरम्यान, वीस ते पंचवीस मिनिटांनी वाहतूक सुरळीत झाली.

May 12, 2017, 12:07 PM IST

रेल्वे प्रवाशांचे तिकीट रात्री टीसीला चेक करता येणार नाही!

रेल्वेने तुम्ही रात्रीचा प्रवास करत असाल आणि तुम्ही झोपले तर काही हरकत नाही. टीसी तुम्हाला तिकीट पाहण्यासाठी उठवू शकणार नाही. कारण रेल्वेच्या नव्या नियमानुसार रात्रीचे तिकीट तपासणी टीसीला करता येणार नाही.

Feb 3, 2017, 09:34 PM IST

खुशखबर! रेल्वे प्रवाशांना देणार 10 लाखांचा विमा

नवी दिल्लीः रेल्वेने प्रवाशांसाठी 10 लाखांचं विमा करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर तिकीट बुकींग करणाऱ्यांना एक रुपयात 10 लाखांच्या अपघाती विमा कवच असणार आहे. अपघात झाल्यास प्रवाशांसाठी हा विमा असणार आहे.

Jul 28, 2016, 12:57 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज.. १ जूनपासून तिकीट बुकिंगचे पैसे वाचणार...

 रेल्वे प्रवास आणखी सुविधाजनक आणि खिशाला परवडणारा बनविण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला असून आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तिकीट बूक केल्यास ३० रुपये सर्व्हिस चार्ज आता द्यावा लागणार नाही. 

May 30, 2016, 09:19 PM IST

रेल्वे स्टेशन परिसरात तात्काळ वैद्यकीय मदत, खासगी डॉक्टरांकडून उपचार शक्य

रेल्वे स्टेशन परिसरात जखमी प्रवाशाला तत्काळ वैद्यकीय मदत मिळणं शक्य होणार आहे. स्टेशनवर डॉक्टर उपलब्ध नसल्यास नजीकच्या खासगी डॉक्टरला मदतीसाठी बोलावता येणार आहे.

May 13, 2016, 11:45 PM IST

रेल्वेच्या वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी प्रवास करु शकाल!

आता वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रवास करणे शक्य होणार आहे.

Mar 5, 2016, 09:49 AM IST

संवाद बैठक खासदारांवरच उलटली

संवाद बैठक खासदारांवरच उलटली

Dec 6, 2015, 08:44 PM IST

रेल्वे अपघात झाल्यास प्रवाशाला मिळणार भरपाई, एलआयसीबरोबर करार

रेल्वेचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी रेल्वेने आता पुढाकार घेतला आहे. रेल्वे दुर्घटनेत मृत्यू किंवा कोणी प्रवासी जखमी झाला तर त्याला आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र, रेल्वे स्वत:च्या खिशातील पैसे देणार नाही तर विमा कंपनी ही मदत देणार आहे.

Oct 8, 2015, 08:43 PM IST

रेल्वे रद्द झाली तर एसएमएसने प्रवाशांना माहिती

रेल्वे प्रवाशासांठी एक चांगली बातमी आहे. तुमची रेल्वे प्रवास करण्यापूर्वी रद्द झाली तर त्याची माहिती तुमच्या मोबाईलवर एसएमएसने मिळणार आहे. मात्र, तुम्ही आरक्षण केलेले हवे. ज्यांनी प्रवासाचे आरक्षण केलेय, त्यांनाच एसएमएस रेल्वे पाठवणार आहे.

Jun 26, 2015, 04:48 PM IST

मनमाड येथे धावत्या रेल्वेत मारहाण करत प्रवाशांना लुटले

अनकाई रेल्वेस्थानकांच्या दरम्यान धावत्या मनमाड - नगरसूल पॅसेंजर ट्रेनमध्ये सहा जणांना मारहाण करत लुटले. त्यामुळे रेल्वेतील सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. 

Apr 9, 2015, 01:22 PM IST

मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी 'प्रभू' आले धावून

मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी 'प्रभू' आले धावून

Nov 21, 2014, 11:36 PM IST

भोंगळ कारभारामुळे मध्य रेल्वेने रद्द केल्या २३ गाड्या

डोंबिवली आणि कळवा या दोन ठिकाणी पेंटोग्राप तुटल्याचा फटका सेवेसेवला बसला. सकाळच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हात झालेत. तर काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा चुकल्यात. त्यामुळे प्रवाश्यांनी रेल्वेला लाखोली वाहीली. दरम्यान, रेल्वेच्या खोळंब्यामुळे सकाळच्या वेळी मध्य रेल्वेने २३ रेल्वे सेवा रद्द केल्या.

Oct 10, 2013, 03:41 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली सेवा पूर्वपदावर आली आहे. मध्य रेल्वेने पेंटोग्राफ दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं. सकाळी ६.३० वाजता ठप्प झालेली रेल्वे सेवा सकाळी साडेनऊनंतर हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली. दरम्यान, गाड्या लेट आहेत.

Oct 10, 2013, 11:20 AM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

डोंबिलवली जवळ लोकलचा पेन्टाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची सेवा कोलमडली आहे. त्यामुळे मुंबईकडे नोकरीनिमित्ताने येणाऱ्यांचे हाल झाले आहेत. दरम्यान, स्लो वाहतूनक फास्ट ट्रकवर वळविण्यात आली आहे. तोच काहीसा दिलासा मध्य रेल्वेने दिलाय.

Oct 10, 2013, 08:06 AM IST