उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी आज प्रचार समाप्ती
राजकीय दृष्ट्य सर्वात महत्वाच्या उत्तर प्रदेशात विधानसभे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याकरता आज संध्याकाळी प्रचार समाप्ती होणार आहे.
Feb 6, 2012, 11:29 AM ISTराहुल गांधीनी माफी मागावी - उमा भारती
राहुल गांधी यांनी जे काही शब्द वापरले आहेत, त्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या प्रचारप्रमुख उमा भारती यांनी केली आहे.
Jan 21, 2012, 03:27 PM ISTप्रियांका राजकारणात सक्रीय
काँग्रेसचे सरचिटणीस राहुलने सांगितले तर मी राजकारणात येईन, असे संकेत आज प्रियांका गांधी-वढेरा यांनी दिलेत. याचवेळी मी सध्या उत्तर प्रदेशात प्रचार करीत आहे. राहुलला माझ्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत, त्या मी पूर्ण करणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
Jan 17, 2012, 03:34 PM ISTमुंबईत स्टार प्रचारकांची मांदियाळी
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव पहिल्या नंबरवर असणार आहे. मुंबई भाजपनं मोदींना प्रचारासाठी आमंत्रित करणारं पत्र पाठवलंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने शरद पवार यांनाही मैदानात उतरविण्याचा चंग बांधला आहे. काँग्रेसदेखील राहुल गांधींना प्रचारात उतरवण्याच्या विचारात आहे.
Jan 14, 2012, 04:26 PM ISTराहुल गांधींचा पुतळा 'उलेमा'नं जाळला
उलेमा कौन्सिलच्या कार्यकर्त्यांसह काही तरुणांनी आज गुरुवारी येथील शिबिली नॅशनल महाविद्यालयासमोर आंदोलन करत कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा पुतळा जाळून निषेध केला. बाटला हाऊस जामियानगर येथील पोलीस चकमकीच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, या मागणीसाठी हे तरूणांनी आंदोलन केले.
Jan 12, 2012, 05:44 PM ISTउ. प्रदेशमध्ये राजकीय वारसदारांचे भवितव्य पणाला
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभेच्या निवडणुका अनेक राजकीय घराण्यांच्या वारसदारांसाठी सत्वपरिक्षा घेणारा ठरेल. काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी आणि त्यांचे चुलत भाऊ भाजपाचे वरुण गांधी यांच्यासाठी ही कठिण परिक्षा असेल. या व्यतिरिक्त समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यादव यांचे चिरंजीव अखिलेख यादव तसंच अजित सिंग यांचे चिरंजीव जयंत चौधरी यांचीही कसोटी लागणार आहे.
Jan 1, 2012, 06:28 PM ISTराहुल बोले, सरकार चाले- अण्णा
कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांना लोकपालच्या कक्षेतून वगळल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर विश्वासघात केल्याचा आरोप लावला आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांना वगळण्याचा निर्णय हा काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्यामुळेच पंतप्रधानांनी घेतल्याचाही आरोप अण्णांनी यावेळी केला.
Dec 2, 2011, 01:54 PM ISTयुवक काँग्रेस संमेलनात पंतप्रधान व सोनिया गांधी
नवी दिल्ली येथे युवक काँग्रेस संमेलनाला पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन केलं. याच युवक काँग्रेसच्या अधिवेशनात शस्त्रक्रियेनंतर प्रथमच सोनिया गांधीं सार्वजनिक सभेत बोलत होत्या.
Nov 29, 2011, 06:22 PM ISTदिल्लीतील भिकारीपण यूपीचेच- राहुल
कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसात वक्तव्य करून चर्चेत राहायचं असंच ठरवले आहे्. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राबद्दल केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच भोवलं आहे. कारण की, त्यानंतर सगळ्या स्थरातून त्यांचावर टीका होत होती,
Nov 23, 2011, 12:09 PM ISTकाँग्रेसच्या युवराजांचे भावनिक आवाहन
काँग्रेसचे महासचिव राहुल यांनी उत्तर प्रदेशाचा कायापालट करुन येत्या पाच वर्षात देशातलं क्रमांक एकच राज्य बनवू असं आश्वासन दिलं. बाराबंकी इथे प्रचंड जनसमुदाया समोर बोलताना राहुल गांधी म्हणाले की मी तुम्हाला खात्री देतो की पाच वर्षात उत्तर प्रदेश उद्योग, व्यावसाय आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत क्रमांक एकच राज्य बनेल.
Nov 22, 2011, 03:18 PM ISTराहुल गांधीविरोधात बदनामीची तक्रार
काँगेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात फारुख घोसी यांनी वांदे न्यायदंडाधिकाऱ्यांकडे बदनामीची तक्रार नोंदवली.
Nov 16, 2011, 06:40 AM ISTराहुल वक्तव्यावर राष्ट्रवादी नाराज
उत्तर प्रदेशातल्या लोकांनी महाराष्ट्रात जाऊन किती दिवस भीक मागणार, या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Nov 15, 2011, 09:08 AM IST'महाराष्ट्रात जाऊन किती दिवस भीक मागणार'
महाराष्ट्रात जाऊन किती दिवस भीक मागणार, असा भावनिक सवाल उ. प्रदेशातल्या मतदारांना करत राहुल गांधींनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. राहुल यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद मग मुंबईपासून दिल्लीपर्यंत उमटले. राहुल गांधींचं हे वक्तव्य म्हणजे प्रांतवाद नव्हे काय, असा सवाल करत शिवसेनेनंही टीकेची संधी सोडली नाही.
Nov 15, 2011, 07:24 AM ISTराहुल गांधी हत्तीला काबूत आणणार का?
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ राहुल गांधी सोमवारी करणार आहेत. बहुजन समाज पार्टीच्या सर्वसर्वा आणि मुख्यमंत्री मायावतींशी वाढत्या संघर्षाची सुरवातच या प्रचार मोहिमेने होणार आहे.
Nov 13, 2011, 05:35 PM IST