`मनसे`ची नलावडेंच्या कुटुंबाला लाखाची मदत
पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेले शेतकरी, चंद्रकांत नलावडे यांच्या कुटुंबियांना मनसेने एक लाख रुपयांची मदत दिली आहे.
Nov 14, 2012, 09:14 AM ISTराज ठाकरे करणार संघटनात्मक बांधणी
संघटनात्मक बांधणी करताना कार्यकर्त्यांबरोबर विभागवार संवाद साधण्यासाठी मेळावे आयोजित करा, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याचे समजते. दरम्यान, राज संघटन बांधणी नव्याने करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Nov 11, 2012, 10:16 AM ISTराज ठाकरेंसह `मनसे` महापालिकेत ढेरेदाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महालिकेतील मनसे कार्यालयाचं आज उदघाटन केलं. मनसेच हे कार्यालय अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त असणार आहे.
Nov 9, 2012, 06:00 PM ISTबाळासाहेबांसाठी `मनसे` प्रार्थना
बाळासाहेब यांच्या स्वास्थ्यासाठी शिवसेना नेते आणि शिवसैना कार्यकर्ते देवाला साकडे घालीत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही यात मागे राहिलेली नाही. मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी मनाने शिवसैनिक असलेल्या जुन्या सहका-यांना घेऊन राज्यातील काही देवस्थानांना भेटी दिल्या. यावेळी बाळासाहेबांची प्रकृती बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केली.
Nov 8, 2012, 11:59 AM ISTराज ठाकरे नव वर्षाला फाडणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. डिसेंबरपर्यंत आपण फारसं काहीही बोलणार नाही, मात्र नवीन वर्षात सर्वांना फाडायला सुरुवात करणार असल्याचं राज ठाकरे म्हणालेत.
Oct 24, 2012, 03:37 PM ISTमनसेचा `राडा`, पोलिसांनी घातला आधीच `खोडा`
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासह तिघांना मुंबई पोलिसांकडून चांगलीच तंबी देण्यात आली. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष`सारेगमप` या शोचं शूटिंग बंद पाडण्याचा प्रयत्नात आहेत.
Oct 18, 2012, 01:27 PM ISTराज ठाकरेंचा फुसका बार; इंजिन धावलंच नाही
राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणातल्या शहरी भागांपुरतीच मर्यादित असल्याचं नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होतंय. राज ठाकरे आणि मनसे नेत्यांनी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्यानं पुढच्या निवडणुकांतही मनसेच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, हे वास्तवही नेत्यांना कळू लागलंय.
Oct 18, 2012, 08:52 AM ISTमनसे कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला साड्यांमधला घोटाळा
पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलजवळच्या महापालिकेच्या गोडाऊनमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. निमित्त होतं महापालिकेच्या साडी खरेदी घोटाळ्याचं.....
Oct 17, 2012, 10:50 PM ISTमनसेच्या दोन आमदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मनसे तर्फे रास्ता रोको करण्यात आला होता. कांजुरमार्ग डंम्पिंग ग्राउंडच्या विरोधात मनसेनं रास्ता रोको केला होता.
Oct 15, 2012, 07:01 PM ISTमनसेचा पोटनिवडणुकीतही पराभव, सेनेने मारली बाजी
कल्याण - डोंबिवलीमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने विजय मिळविला आहे. तर मनसेला इथे पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
Oct 15, 2012, 06:37 PM ISTपुण्यात आजचा दिवस आंदोलनांचा
पुण्यामध्ये आजचा दिवस आंदोलनांचा होता. मनसेनं पाण्यासाठी, आरपीआयनं गॅस दरवाढीविरोधात तर शेतकरी संघटनेनं शेतमालाची निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं.
Oct 15, 2012, 05:02 PM ISTअशोकरावांनी मनसेची अवस्था वाईट करून टाकली
नांदेड महानगरपालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी आपला करिष्मा दाखवला आणि पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यास ते सज्ज झाले.
Oct 15, 2012, 02:21 PM ISTराज ठाकरेंमुळे मनोहरपंतानी मारली दांडी
रविंद्र नाट्य मंदिरात होणाऱ्या सोहळ्यात सेना मनसे एकत्र आलेच नाही. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर आज प्रथमच राज ठाकरे आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी एकाच मंचावर येत होते. परंतु, दुसरा कार्यक्रम असल्याचे सांगून मनोहर जोशी यांनी या कार्यक्रमाला येणे टाळले.
Oct 12, 2012, 09:22 PM ISTमनसेने काढला शिक्षणमंत्र्यांचा घोटाळा बाहेर
राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी नवी मुंबईतल्या शिक्षण संस्थेतला गोंधळ समोर आलाय. वाशीच्या सिलिकॉन टॉवर या निवासी इमारतीच्या एका मजल्यावर केवळ 4-5 खोल्यांमध्ये हे कॉलेज सुरू आहे.
Oct 12, 2012, 07:27 PM ISTनाशिककरांवर अजूनही पाणीकपातीचं संकट
राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली तरी नाशिककरांची पाण्याची समस्या कायम आहे. नाशिकच्या बहुतेक भागांत अतिशय कमी दाबानं आणि अनियमित पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे नाशिककर आता रस्त्यावर उतरु लागलेत. प्रशासन मात्र अजूनही आश्वासनापलीकडे काहीच देत नाही.
Oct 3, 2012, 07:08 PM IST