भज्जीच्या क्रिकेट अकॅडमीला मनसे, भाजपचा विरोध
भारताचा अनुभवी स्पिनर हरभजन सिंगनं मुंबईतील अंधेरीमध्ये क्रिकेट ऍकेडमी काढण्यासाठी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेतली. भज्जीच्या या क्रिकेट ऍकेडमीला भाजपनं विरोध केलाय, तर मनसेनंही परप्रांतियांचा सूर आळवलाय.
Feb 13, 2013, 10:11 PM IST`बाळासाहेबांची इच्छा अपूर्णच, आपण तरी काय करणार!`
‘राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही बाळासाहेबांची आणि काही हितचिंतकांची इच्छा होती, मात्र ते दोघं एकत्र येत नाहीत, त्याला आपण तरी काय करणार’ अशी खोचक आणि तरिही सूचक अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलीय.
Feb 13, 2013, 03:24 PM ISTमाझा दौरा उभा महाराष्ट्र काबीज करण्यासाठीच- राज
आज कोल्हापुरातल्या गांधी मैदानात राज ठाकरे यांच्या दौऱ्यातील पहिलं भाषण केलं. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला. आपल्याला होत असलेल्या जबड्याचा त्रास आणि सर्दी-खोकला यांच्यावर टिप्पणी करत भाषणाला सुरूवात केली.
Feb 12, 2013, 09:21 PM ISTराज ठाकरेंच्या कोल्हापूर भाषणातील ठळक मुद्दे
राज ठाकरे यांच्या कोल्हापुरातील सभेला तुफान गर्दी झाली. कोल्हापुरातील गांधी मैदानावर राज ठाकरेंचे भाषण सुरू झाले. राज ठाकरेंच्या सभेला प्रचंड उत्साह, राज ठाकरेंचा जयघोष सुरू होता.
Feb 12, 2013, 08:05 PM ISTपुण्यात मनसेची राष्ट्रवादीसोबत छुपी युती?
कधी तटस्थ राहत, कधी बहिष्कार टाकत तर कधी थेट पाठिंबा देत मनसेनं राष्ट्रवादीला मनसे साथ दिल्याचं पाहायला मिळालं. .पुणे शहराचा विकास आराखडा मजूर करताना तर मनसेने उपसूचना देत, सोयीस्कर मौन पाळलं.
Feb 12, 2013, 06:45 PM ISTठाण्यात मनसेची मिळणार आघाडीला साथ?
ठाणे महापालिकेच्या सत्ता संघर्षाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा राजकीय भूमिकांमध्ये बदलाचे वारे वाहू लागलेत.
Feb 12, 2013, 12:02 PM ISTसध्या गालावर टाळी वाजवतोय – राज ठाकरे
राज्यातील लाखो शिवसैनिक आणि मनसैनिकांना ज्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे, त्या प्रश्नाला आज पुन्हा राज ठाकरे यांनी बगल दिली आहे. शिवसेना-मनसे एकत्र येणार का? या ‘टाळी वाजणार का?’ असा प्रश्न साताऱ्यात पत्रकारांनी विचाराला पण आपल्या खास शैली राज ठाकरे यांनी पत्रकारांना उत्तर दिले.
Feb 11, 2013, 10:40 PM ISTसेना-मनसेचं पाणी कपातीवरून राजकारण
नाशिकमध्ये पाण्यावरून राजकारण सुरु झालंय. शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्वतःच्या प्रभागात पाणीकपात सुरु केली आहे. मात्र सत्ताधारी मनसेचा या पाणीकपातीला विरोध आहे. नाशिकमध्ये पाण्याचं राजकारण सुरू आहे. पण या सगळ्यात नाशिककरांचं मत कुणीच विचारात घेत नाही.
Feb 11, 2013, 09:26 PM ISTसेना-मनसेत जुंपली `अँड्रॉइड` फोनवरून!
मुंबई महापालिका नगरसेवकांना मोफत अँन्ड्रॉईड फोन देणारे आहे.२२७ नगरसेवकांना अँन्ड्रॉईड फोन खरेदीच्या प्रस्तावाला मनसेन विरोध केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसेत अँन्ड्रॉईड फोनवरना जुंपली आहे.
Feb 11, 2013, 09:10 PM ISTठाणे महापालिकेत मनसेचा राष्ट्रवादीशी काडीमोड!
ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीप्रणित लोकशाही आघाडीत सहभागी असलेली मनसे आघाडीशी काडीमोड घेण्याच्या तयारीत आहे. लोकशाही आघाडीतून मनसे बाहेर पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यासाठी मनसेनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
Feb 11, 2013, 05:00 PM ISTगुरूची फाशी, राजकीय खेळी – राज ठाकरे
संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी अफझल गुरूला देण्यात आलेली फाशी ही केंद्र सरकारची राजकीय खेळी असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
Feb 11, 2013, 09:15 AM ISTराज ठाकरे यांचा आजपासून राज्यव्यापी दौरा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा आजपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात राज कोणाला टार्गेट करणार आणि काय बोलणार याची उत्सुकता आहे.
Feb 10, 2013, 08:33 AM ISTउद्धव ठाकरेंच्या सभेचे राज यांना आव्हान?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जालन्यात सभा होत आहे. मात्र, राज यांच्यासमोर शिवसेनेचे पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सभेचा रेकॉर्ड तोडण्यासाठी गर्दी जमविण्याचे आव्हान असणार आहे.
Feb 5, 2013, 01:05 PM ISTटाळी वाजलीच नाही, मनसेचं `एकला चलो रे`
ठाण्यातील जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यात मनसेसह महायुतीला १८तर आघाडीला २२ जागा मिळाल्या आहेत.
Feb 5, 2013, 10:26 AM ISTसेना-मनसे मनोमिलनाची वाजणार `टाळी`
सेना-मनसे एकत्र येणार का..? ह्या प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका हाताने टाळी वाजत नाही, दोघांना एकत्र बसवून हा प्रश्न विचारा अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळेच आता दुसरा हात जवळ आला असून टाळी वाजण्याची शक्यता आहे.
Feb 4, 2013, 09:52 AM IST