राज ठाकरे का झाले नाराज?
शिवसेना-भाजप आणि आरपीआय या महायुतीला मनसेचं इंजिन, असे प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार आहे. हे वृत्त दिशाभूल करणारं आहे, अशी माहिती खुद्द राज ठाकरे यांनी दिलीय. यावेळी राज ठाकरे यांनी बातमी संदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
Mar 8, 2013, 12:16 PM IST`असमर्थ ठरलेल्या विरोधी पक्षांची ही गरज...`
विरोधी पक्षांची म्हणून एक जागा असते आणि शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही जागा घालवलेली आहे, अशी तिखट प्रतिक्रिया लोकसत्ता या वर्तमानपत्राचे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी दिलीय
Mar 8, 2013, 10:06 AM ISTएक एप्रिलची बातमी चुकून छापली; सेनेची मिश्किल प्रतिक्रिया
महायुतीत ‘मनसे’ सहभागी होणार या बातमीवर शिवसेना नेत्यांनी मात्र कानावर हात ठेवलेत.
Mar 8, 2013, 09:41 AM IST‘एटीएम’मधला ‘टी' बळकट होणार?
रामदास आठवले, उद्धव ठाकरे, आणि गोपीनाथ मुंडे अशी महायुतीचं ‘एटीएम’ म्हणून ओळखंल जात होते. मनसे महायुतीत सहभागी झाल्यास एटीएममध्ये आणखी एक ‘टी’ (ठाकरे) सहभागी होणार आहे. त्यामुळं या महायुतीतला ‘टी’ आणखी पॉवरफुल्ल होणार आहे.
Mar 8, 2013, 08:43 AM ISTमहायुतीला मनसेचं ‘इंजिन’?
राज्याच्या राजकारात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रभाव मोडून काढण्यासाठी शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीत मनसेला सहभागी करुन घेण्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Mar 8, 2013, 08:24 AM ISTमनसेचा लढा सुरू, मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी
प्राध्यापकांचे आंदोलन सुरु असताना युवासेना आणि मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहिलीये. महाविद्यालयीन परीक्षांसाठी विद्यापीठानं पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी मनसेनं केलीये.
Mar 7, 2013, 04:17 PM ISTएफवाय, एसवायचे वेळापत्रक जाहीर करा - मनसे
प्राध्यापकांचे आंदोलन सुरु असताना युवासेना आणि मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहिलीये. महाविद्यालयीन परीक्षांसाठी विद्यापीठानं पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी मनसेनं केलीये.
Mar 7, 2013, 04:10 PM ISTदुष्काळग्रस्त भागांना मनसेची मदत
दुष्काळग्रस्त भागात तातडीने चारा छावण्या उभारण्याचे आदेश, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिका-यांना दिले आहेत. औरंगाबाद,. जालना, बीड, सोलापूरमध्ये दुष्काळग्रस्त भागात तातडीने मदत यंत्रणा कार्यरत होणार आहे.
Mar 6, 2013, 09:46 PM ISTमनसेचा राष्ट्रवादी विरोध खरा की दिखावा?
राज ठाकरेंचा राज्यातला दौरा चांगलाच गाजला तो अजित पवार आणि राष्ट्रवादीवरच्या टीकेवरून.. दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे चांगलेच राजकारण रंगलं. आणि त्यातून हा वाद थेट दगडफेकीपर्यंत पोहोचला. मात्र मनसेचा राष्टवादी विरोध खरा आहे की दिखावा?
Mar 6, 2013, 06:29 PM ISTमराठी हद्दपार : UPSCप्रकरणी राज ठाकरे गप्प का?
केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC नं प्रादेशीक भाषांमध्ये परीक्षा देण्याचा पर्याय काढून टाकलाय. आयोगाच्या या निर्णया विरोधात शिवसेनेनं हुतात्माचौकात आंदोलन केलंय. मात्र, मराठीच्या मुद्यासाठी रान उठवणा-या राज ठाकरेंच्या मनसेकडून या विषयावर अद्याप पर्यंत कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.
Mar 6, 2013, 04:30 PM ISTपरप्रांतीय प्रकरण: मनसेच्या १० जणांवर गुन्हा दाखल
साताऱ्यातल्या सैनिकी शाळेत प्रवेश प्रक्रियेत गोंधळ घातल्याप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mar 5, 2013, 04:24 PM ISTराज ठाकरेंपुढे अजित दादा शांत का?
राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यात सुरु असलेल्या वाग्युद्धामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विशेषतः दादांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
Mar 4, 2013, 07:22 PM ISTमराठी'राज'... 'माझी भूमिका मराठी माणसासाठीच...'
माझी भूमिका ही मराठी माणसांसाठीच आहे आणि त्यात अजिबात बदल होणार नाही, असं ठासून सांगत राज ठाकरेंनी एकप्रकारे आपल्या कार्यकर्त्यांच्या कृत्याचं समर्थनच केलंय.
Mar 4, 2013, 05:57 PM ISTमनसेचा राडा, साताऱ्यातून परप्रांतीयाना हुसकावले
साताऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना राडा केल्याने येथील वातावरण तापले आहे. साताऱ्यातल्या सैनिकी शाळेत प्रवेश प्रक्रियेवरुन गोंधळ झालाय. उत्तरप्रदेश आणि बिहारच्या विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. आज दुपारी ही घटना घडली.
Mar 4, 2013, 03:06 PM ISTशिवसेनेला मराठीचं वावडं! मनसेची टीका
मराठीचा कैवार घेऊन लढणा-या शिवसेनेलाच मराठी भाषेचं किती वावडं आहे. याचा प्रकार मुंबईत उघड झालाय. ताडदेव इथल्या शिवसेनेच्या एका शाखेनं शिवजयंती साजरी करण्यास लागणारा निधी गोळा करण्यासाठी चक्क इंग्रजीमध्ये मजकूर छापला आहे. मनसेनं ही संधी साधत शिवसेनेच्या दुटप्पीपणावर जोरदार टीका केली आहे.
Mar 3, 2013, 07:37 PM IST