फेरीवाला धोरणाला शिवसेना-मनसेचा विरोध
फेरीवाला धोरणाला शिवसेना-मनसेनं विरोध केलाय. फेरीवाला धोरणाविरोधात सभागृहात मनसेन मुंबई महापालिका सभागृहात बॅनर्स फडकावून विरोध केला. या धोरणामुळे मुंबई बकाल होईल, असा दावा महापौर सुनील प्रभूंनी केला.
Mar 12, 2013, 10:50 PM ISTमराठी : मनसे, सेना आंदोलन आता लोकसभेत आवाज
यूपीएससी परीक्षेतून स्थानिक भाषा बाद करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्यात वाढता विरोध होतोय. शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष यासाठी आक्रमक झालेत. शिवसेनेनं रस्त्यावर आंदोलन सुरू केलं असतानाच पक्षाच्या खासदारांनी संसदेत हा विषय लावून धरलाय.
Mar 12, 2013, 07:20 PM ISTराज ठाकरेंचा `राम` चीनमध्ये
मनसे आमदार राम कदम यांनी आपण चीनमध्ये असल्याचा खुलासा केला आहे. मनसेच्या सातव्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याला राम कदम गैरहजर होते.
Mar 12, 2013, 04:16 PM ISTराज वादाचे पडसाद नाशिक महापौरांना भोवणार
मनसे आणि खडसे वादाचे पडसाद भाजप-मनसे युती असलेल्या नाशिकमध्येही उमटलेत. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर उपमहापौरांनी चक्क महापौरांच्या विरोधात प्रेसनोट काढून आपला राग व्यक्त केलाय.
Mar 12, 2013, 03:18 PM ISTउद्धव ठाकरेंचा राजला अप्रत्यक्ष टोला!
महाराष्ट्रामध्ये जरा फिरा, महाराष्ट्र खूप मोठा आहे. मनोरंजनासाठी खूप गोष्टी आहेत, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.
Mar 11, 2013, 08:47 PM ISTखडसे-मनसे वाद, सत्तेची `सेटलमेंट` बाद?
खडसे-मनसे वादाचे पडसाद आता नाशिकमध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये सत्तेची ‘सेटलमेंट’ अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Mar 11, 2013, 07:20 PM ISTराज ठाकरे योग्यवेळी उत्तर देतील- नांदगावकर
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंच्या टीकेला मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी जोरदार उत्तर दिलंय. मनसेला नको त्या गोष्टी उघड करण्यास भाग पाडू नका असं सांगत विरोधी पक्षनेत्यांनी आजपर्यंत सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांचा लेखाजोखा द्यावा असं आव्हान दिलंय.
Mar 11, 2013, 06:22 PM ISTखडसेंनी हाणला राज ठाकरेंना जोरदार टोला!
राज ठाकरेंनी नुसते आरोप करू नयेत, तर पुरावे द्यावेत अशा शब्दांत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पटलवार केलाय.
Mar 11, 2013, 05:31 PM ISTमनसेनेनं राज्यपालांना घेरलं तर सेनेचा हांडा मोर्चा
अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने आपला आक्रमकपणा दाखवून देण्यास सुरूवात केलेय. पहिल्याच दिवशी राज्यपालांना घेराव मनसेकडून करण्यात आला. तर शिवसेनेने मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. दुष्काळ समस्या सोडविण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप सेनेने केला.
Mar 11, 2013, 01:38 PM ISTमनसे अधिक आक्रमक होणार, राज बैठकीत निर्णय
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभांमध्ये राज्यात विरोधी पक्ष दिसत नाही, अशी सातत्याने टीका केली. यावर उत्तर मनसेने शोधून काढण्याचा ठरवलंय. कृष्णकुंजवर मनसे आमदारांची बैठक झाली. या बैठकीत अधिक आक्रमक होण्याचा निर्णय झाल्याचे समजते. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची व्युहरचना करण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात येत आहे.
Mar 10, 2013, 02:41 PM ISTमनसे कार्यकर्त्यांचा वखार अधिकारी कार्यालयात धुडगूस
यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा येथे वखार अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालीत तोडफोड केली आहे.
Mar 9, 2013, 05:49 PM ISTस्वबळावर महाराष्ट्रात सत्ता आणणारच - राज
महाराष्ट्रात स्वबळावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आणणार. ही सत्ता मी आणणार म्हणजे आणणारच, असा ठाम विश्वास अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला.
Mar 9, 2013, 01:34 PM ISTमनसेनं शेवटी ‘घरात’ घुसून राडा केलाच…
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीवर टीका करताना राज ठाकरेंनी म्हटलं होतं की , आमच्या नादाला लागाल तर घरात घुसून मारू...’ अन् शुक्रवारी रात्री उशिरा मनसेच्या कार्यकर्त्यांनी खरोखरच घरात घुसून ‘राडा’ केला. पण, राष्ट्रवादीच्या नव्हे स्वत:च्याच घरात मनसे कार्यकर्त्यांनी हा राडा केलाय.
Mar 9, 2013, 12:57 PM IST‘षण्मुखानंदा’त रंगणार मनसेचा वर्धापन दिन सोहळा!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज सातवा वर्धापन दिन आहे. राज्यातला दुष्काळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेला त्यांचा वाद, तसेच सेना-भाजप-मनसे अशा विशाल युतीची चर्चा या सर्व पार्श्वभूमीवर आजच्या वर्धापनदिनाला मोठं महत्व प्राप्त झालंय.
Mar 9, 2013, 09:56 AM ISTमनसेनेने विद्यापीठाच्या केंद्राला ठोकलं टाळं
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज पुणे विद्यापीठाच्या नाशिकमधील उपकेंद्राला टाळं ठोकलं. परीक्षा विभागाच्या कारभाला कंटाळून हे ठाळं ठोकण्यात आलंय.
Mar 8, 2013, 05:44 PM IST