पीएसआय सचिन सूर्यवंशी अखेर निलंबित
महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदारांनी चोप दिलेल्या पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केली. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आले आहे.
Mar 25, 2013, 04:37 PM ISTसचिन सूर्यवंशींना अटक कधी?
राज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळला आहे. पीएसआय सचिन सूर्यवंशींना कधी अटक होणार असा सवाल संतप्त आमदारांनी विधानसभेत विचारला.
Mar 25, 2013, 02:38 PM ISTमनसेचे अमरावतीतही इंडियाबुल्समध्ये खळ्ळ-खट्याक
अमरावतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंडियाबुल्सवर केलेल्या टीकेनंतर मुंबईनंतर आता अमरावतीतही त्याचे पडसाद पडले आहे. अमरावतीतील इंडियाबुल्सच्या क्षेत्रीय कार्यालयावर मनसेच्या २५ ते ३० जणांच्या जमावाने हल्ला केला
Mar 25, 2013, 01:18 PM ISTआमदार क्षितीज ठाकूर देणार राजीनामा?
पीएसआय मारहाणप्रकरणी निलंबित आमदार क्षितीज ठाकूर आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मारहाणप्रकरणी शुक्रवारी अटक झाल्यानंतर ते कोठडीत होते. आज त्यांना जामीन मिळालाय.
Mar 25, 2013, 12:43 PM ISTमनसे, बविआच्या निलंबित आमदारांना जामीन
पीएसआय सचिन सूर्यवंशींना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मिळाला आहे. तीन दिवस त्यांना जेलमध्ये काढावे लागले. त्यांची १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आलेय.
Mar 25, 2013, 12:33 PM ISTमुंबईत मनसेच्या पाच कार्यकर्त्यांना अटक
राज ठाकरे यांनी आमरावती येथे भाषणात केलेल्या इंडियाबुल्स कंपनीवरील टीकेचे पडसाद मुंबईमध्ये उमटले. मुंबईतील परळ येथील इंडियाबुल्स कंपनीच्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली.
Mar 25, 2013, 10:41 AM ISTEXCLUSIVE- परळ येथील इंडियाबुल्सच्या ऑफिसवर हल्ला!
राज ठाकरे यांनी काही वेळापूर्वी आमरावती येथे भाषणात केलेल्या इंडियाबुल्स कंपनीवरील टीकेचे पडसाद मुंबईमध्ये उमटले आहेत. मुंबईतील परळ येथील इंडियाबुल्स कंपनीच्या कार्यालयावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला असून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
Mar 24, 2013, 09:24 PM ISTअजित पवार, ७० हजार कोटी रुपये गेले कुठे? - राज
अमरावती येथे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं. सिंचनाचं पाणी इंडियाबुल्सला देऊ नका असं सभेपूर्वीच राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं.
Mar 24, 2013, 08:29 PM ISTराज ठाकरेंची तोफ अमरावतीत आज धडाडणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ अमरावतीत आज धडाडणार आहे. राज ठाकरे कोणाचा समाचार घेणार याकडं सा-याचं लक्ष लागलं आहे.
Mar 24, 2013, 08:47 AM ISTमनसेची मागणी, होळीला करा पाणी कपात
मुंबईत होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी २५ टक्के पाणी कपात करावी अशी मागणी मनसेन केली आहे. मनसे ही मागणी मुंबई महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
Mar 23, 2013, 09:36 PM ISTराम कदम यांचा वाढू शकतो तुरुंगवास?
मुंबईतील वाहतूक शाखेचे पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक झालेले आमदार राम कदम यांच्यासमोरील अडचणींत आणखी वाढ होण्याची चिन्ह आहेत.
Mar 22, 2013, 01:20 PM ISTपोलीस मारहाण : निलंबित आमदारांना पोलीस कोठडी
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबित मनसेचे आमदार राम कदम आणि भारिपचे आमदार क्षितिज ठाकूर यांना आज किला कोर्टात हजर करण्यात आलेय. त्यांना २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Mar 21, 2013, 03:38 PM ISTमाझी प्रगती अनेकांना खुपतेय – राम कदम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशिर्वादानं आपण मोठे होत असून आपली प्रगती कुणाच्या तरी डोळ्यात खुपतेय, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राम कदम यांनी दिलीय. त्यामुळे राम कदम यांचा नेमका रोख कुणावर होता? असा प्रश्न अनेकांना पडलाय.
Mar 21, 2013, 01:46 PM ISTठाकूर यांच्यापाठोपाठ राम कदमांचीही शरणागती
सूर्यवंशी मारहाण प्रकरणी बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्यापाठोपाठ मनसेचे आमदार राम कदम यांनीही पोलिसांसमोर शरणागती पत्करलीय.
Mar 21, 2013, 11:07 AM ISTराज ठाकरेंना थकवा, ४८ तास विश्रांतीची गरज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ४८ तास सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. त्यामुळे उर्वरित दौऱ्याच्या आधी पुन्हा डॉक्टर तपासणी करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
Mar 20, 2013, 08:57 PM IST