मनसेचं पुन्हा `टोल`आंदोलन; तोडफोड
कोल्हापुरातलं टोलविरोधी आंदोलन पुन्हा पेटण्याची चिन्हं आहेत.. सोमवारी रात्री मनसे कार्यकर्त्यांनी टोलला विरोध करत २ टोलनाक्यांना लक्ष्य केलं.
Apr 30, 2013, 10:13 AM ISTराज ठाकरे पाहणार दुष्काळातील चारा छावण्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील दुष्काळाबाबत राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. हा दुष्काळ मानव निर्मित असल्याची शंका उपस्थित केली आहे. आता राज स्वत: दुष्काळातील चारा छावण्यांची पाहणी करणार आहे. त्यासाठी ते खास दौरा करणार आहेत.
Apr 25, 2013, 04:42 PM ISTदुष्काळग्रस्तांना मदत, मनसेचे बिसलेरीविरोधात आंदोलन
राज्याला दुष्काळाचे भयाण चटके बसत असताना बिसलेरीसारख्या पाणी विकणा-या कंपन्या राज्याचेच पाणी वापरुन कोट्यवधी रुपये कमावत आहे.
Apr 25, 2013, 10:29 AM ISTमराठी कलाकार मनसेत, `राजा`श्रयाला
मनसे आणि शिवसेना यांच्यात आता पुन्हा एकदा जुंपली आहे. पण यावेळेस या दोन्ही पक्षामध्ये मराठी कलाकारांवरून जुपंल्याचे दिसून येते.
Apr 24, 2013, 03:00 PM IST‘पापक्षालना’साठी राम कदम चालले काशीला?
गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेले राम कदम आता काशी यात्रेला गेले आहेत.
Apr 23, 2013, 09:51 PM ISTमनसे महिला नगरसेवकाला दंड ठोठावलाय
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खोटे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी पत्र निवडणूक आयोगाला सादर केल्याप्रकरणी मनसेच्या नगरसेविका कल्पना बहीरट यांना न्यायालयाने २५ हजार रूपयांचा दंड ठोठावलाय. दंडाची ही रक्कम सहा आठवड्यांत राज्य निवडणूक आयोगाला देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.
Apr 23, 2013, 10:16 AM ISTठाणे बंद विरोधात मनसेनी केली तोडफोड
ठाणे बंदला हिंसक वळण लागल्यामुळे बहुतांश टीएमटी बसेस रस्त्यावर न उतरल्यानं वागळे आगारात मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
Apr 18, 2013, 04:29 PM ISTबंदबाबत चर्चा न करताच नाव छापलं - मनसे
ठाणे बंदच्या समर्थनार्थ झळकलेल्या पोस्टर्सवर मनसे पदाधिकाऱ्यांचेही फोटो झळकल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Apr 18, 2013, 03:47 PM ISTबंदबाबत मनसेची नेमकी भूमिका काय?
ठाण्यामध्ये सुरू असलेल्या बंदला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत विरोध केला आहे. त्याच वेळी मनसे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांचं नाव मात्र बंदला पाठिंबा देणाऱ्या पोस्टरवर झळकलं आहे.
Apr 18, 2013, 02:07 PM ISTठाणे बंदला मनसेचा पाठिंबा नाही - राज ठाकरे
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईविरोधात उद्याच्या ठाणे बंदला मनसेचा पाठिंबा नसल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय. अनधिकृत बांधकाम करणा-या बिल्डरांना स्थानिक नगरसेवक आमदारांचा पाठिंबा असल्याची टीका राज यांनी केलीय.
Apr 17, 2013, 07:04 PM ISTराज ठाकरे अनधिकृत बांधकामाबाबत काय बोलले?
ठाण्यात मुंब्रा परिसरातील शिळफाट्यामध्ये सात मजली इमारत कोसळली. या अनधिकृत इमारतीला जो कोणी कारणीभूत असेल त्याच्यावर आधी कारवाई झालीच पाहिजे. बिल्डलरा सोडून सर्वांवर कारवाई केली जात आहे. लागेबंधमुळे बिल्डर मोकाट आहे. हे बिल्डर उत्तर प्रदेशातील आहेत, त्यांच्यावर आधी कारवाई करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
Apr 17, 2013, 06:18 PM ISTपोलीस मारहाण : क्षितीज ठाकूर, राम कदम दोषी
पीएसआय मारहाणप्रकरणी निलंबित बविआचे आमदार क्षितीज ठाकूर आणि मनसे आमदार राम कदम यांना दोषी ठरविण्यात आलेय.
Apr 17, 2013, 01:32 PM ISTशिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना राज ठाकरेंकडून पुरस्कार
ताडोबामध्ये वाघाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना पकडून देणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि इतर नागरिकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ लाख रुपयांचा पुरस्कार दिला आहे.
Apr 16, 2013, 11:01 PM ISTनागपुरात राज ठाकरेंचे जल्लोषात स्वागत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे २ दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आज नागपूरला पोचले आहेत. आपल्या या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे नागपूरसह भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकी घेणार आहेत.
Apr 15, 2013, 02:24 PM ISTअजित पवार बसलेल्या जागेवर गोमूत्र शिंपडले?
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आत्मक्लेश आंदोलनाचे पडसाद आज कराडमध्ये उमटले. यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ प्रीतीसंगमावर शिवसेना, मनसे आणि भाजपनं आंदोलन केलं. आंदोलकांनी प्रीतीसंगमावर गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी विरोधकांना प्रीतीसंगमावर जाण्यापासून रोखले. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.
Apr 15, 2013, 11:22 AM IST