मनसेची राष्ट्रवादीला साथ! शिवसेनेवर मात...
सत्तेचं एक वेगळंच समीकरण पुण्यात पाहायला मिळालं. मनसेनं चक्क राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. आणि जुन्नर नगरपालिकेत शिवसेनेला सत्तेतून पायउतार केलं.
May 14, 2013, 07:05 PM ISTमनसेचं पुढचं टार्गेट... हाऊसिंग सोसायट्या!
मनसेनं निवासी सोसायट्यांचे बोर्ड मराठीमध्ये लिहिण्याची मागणी केलीये. याबाबत त्यांनी मुंबई महानगरपालिकेला एक प्रस्तावही दिलाय. मात्र, हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मागणीवरुन नाराजी व्यक्त केलीय.
May 14, 2013, 01:16 PM ISTकोल्हापूरमध्ये मनसे- शिवसेना आमने सामने
LBT च्या मुद्दावरुन व्यापारी आणि सरकार यांच्यातील तिढा अद्याप कायम असला तरी या मुद्दावरुन राजकीय पक्षच एकमेकांच्या समोरासमोर आल्याचं चित्र कोल्हापुरात पाहायला मिळालं.
May 13, 2013, 08:23 PM ISTमनसेचा एलआयसीला इशारा
मराठी मुलांसाठी नोकरी मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आंदोलन छेडलयं. एलआयसीनं येत्या १८ मे रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी मनसेनं मुंबईत हे आंदोलन केलं.
May 13, 2013, 02:24 PM ISTआंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेचा हिसका
एलबीटीविरोधात आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेनं हिसका दाखवण्यास सुरुवात केलीय. मनसे कार्यकर्त्यांच्या संरक्षणात व्यापाऱ्यांनी आपली दुकानं उघडण्यास सुरुवात केलीय. त्यामुळं आता एलबीटीबाबत व्यापाऱ्यांची भूमिका मवाळ झाल्याचे संकेत मिळतायत.
May 12, 2013, 08:40 AM IST‘कडोंमपा’वर पुन्हा एकदा भगवाच...
कल्याण डोंबिवली महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकलाय. शिवसेनेच्या कल्याणी पाटील महापौरपदी विराजमान झाल्यात.
May 11, 2013, 08:55 PM ISTLBT संपाविरोधात व्यापाऱ्यांना मनसेचा इशारा...
एलबीटीचा मुद्दा आता जास्तच चिघळत चालला आहे. आणि त्यावर मनसेनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याआधीही व्यापाऱ्यांना इशारा दिला होता.
May 9, 2013, 01:03 PM IST`भांडण सरकारशी; जनतेला वेठीस धरू नका'
मुख्यमंत्र्यांनी दाद न दिल्यानं एलबीटी विरोधक व्यापाऱ्यांनी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय.
May 7, 2013, 01:52 PM ISTमनविसेने सोडविला गेटबाहेर पेपर
मुंबई विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये झालेल्या चुकांच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना म्हणजेच मनविसेनं आंदोलन केलं. मनविसेच्या कार्यकर्त्यांनी गेटबाहेर पेपर सोडवून विद्यापीठाचा निषेध केला.
May 7, 2013, 01:16 PM ISTराज यांचा मदतीचा धडा, कार्यकर्त्यांकडून लाखोंचा चुराडा!
एकीकडं राज्यात दुष्काळ पडला असताना मात्र दुसरीकडं मनसेचे पदाधिकारी बैलगाडी शर्यत घेण्यात मग्न असल्याचं चित्र कोल्हापूर जिल्ह्यात पहायला मिळत आहे.
May 6, 2013, 06:28 PM ISTराज ठाकरेंची धुंद तरुणांपुढे गांधीगिरी
धुंद तर्ऱ झालेले तरूण मनसे कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडले आणि त्यांना धूधू धुतले. नंतर राज गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी त्या दोघा धुंद तरूणांची समजूत काढली. त्यांना स्वत:कडील पैसे दिले आणि आयुष्यात पुन्हा मद्याला हात न लावण्याच सल्ला दिला. राज यांच्या या गांधीगिरीमुळे कार्यकर्ते गोंधळात पडले.
May 6, 2013, 04:08 PM ISTमनसे पदाधिकाऱ्याने उकळली मराठी माणसाकडूनच खंडणी
पुण्यात एका तमीळ चित्रपटाच्यार शुटींग दरम्यान एका सहाय्यक निर्मात्याकडुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी 51 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आलाय.
May 4, 2013, 09:45 PM ISTमनसेचे विद्यार्थ्यांसाठी करिअर फेअर सुरू....
वरळीच्या जांबोरी मैदानात ज्ञानमयी करिअर फेअरचं आयोजन करण्यात आलंय. `झी २४ तास`चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर, शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते या फेअरचं उद्घाटन झालं.
May 3, 2013, 03:49 PM ISTराज ठाकरेंनी दिला गुजरातींना सल्ला
`महाराष्ट्र दिनी तरी गुजराती समाजाने बॉम्बे नाही मुंबई म्हणा आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजरातींनी स्वत:ला आधी मराठी समजावं,` असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गुजराती समाजाला त्यांच्याच कार्यक्रमात दिला.
May 2, 2013, 01:25 PM ISTशिवसेनेची काँग्रेस झालेय - रामदास कदम
शिवसेनेचे नेत रामदास कदम यांनी स्वकियांवर हल्लाबोल केलाय. मी काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा मनसेत जाणार असा अपप्रचार केला जातोय, असं वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलंय. शिवसेनेचे काँग्रेस झालेय, असेही ते म्हणालेत.
May 1, 2013, 10:04 PM IST