मनसे

मनसेला दणका, काँग्रेसला विरोधी नेतेपद

पुणे महापालिकेचं विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला मिळालंय. पुणे महापालि्केच्या 40 अ प्रभागातल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या लक्ष्मीताई घोडके विजयी झाल्यात. त्यांनी मनसेच्या इंदूमती फुलावरे यांचा 4 हजार 342 मतांनी पराभव केला.

Jul 8, 2013, 03:21 PM IST

पुणे पोटनिवडणुकीत काँग्रेस, मनसेत टक्कर

पिंपरी चिंचवड मध्ये आज भोसरी मधल्या प्रभाग क्रमांक ३४ मधल्या पोटनिवडणुकीसाठी केवळ 29 टक्के मतदान झालं. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रद्धा लांडे आणि शिवसेनेच्या सारिका कोतवाल यांच्यात या मतदारसंघात थेट लढत आहे.

Jul 7, 2013, 09:51 PM IST

मनसेची वाटचाल खाजगीकरणाच्या दिशेनेच!

खाजगीकरणाला विरोध करत नाशिक शहराची सत्ता काबीज करणाऱ्या मनसेची वाटचाल खाजगीकरणाच्या दिशेनेच सुरु झालीय. निमित्त आहे शहरातला खत प्रकल्प...

Jul 7, 2013, 07:47 PM IST

राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट दयनीय अवस्थेत!

शिवसेनेत असताना राज ठाकरेंनी गोदापार्कचं स्वप्न राज यांनी बघितलं, साकारलं.. मात्र आता तेच गोदापार्क सावरण्याची वेळ मनसे अध्यक्षांवर आलीय.

Jul 6, 2013, 08:04 PM IST

मनसे-काँग्रेस टशन, विरोधी नेतेपद कोणाला?

पोटनिवडणूक... त्यातही महापालिकेची म्हटल्यावर तशी दुर्लक्षितच... पुण्यात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळतेय. महापालिकेच्या एका जागेची पोट निवडणूक कमालीची चुरशीची बनलीय.

Jul 3, 2013, 06:36 PM IST

`बाळासाहेबांच्या नावावर मनसेचं नाटक`

`ईस्टर्न फ्रीवेला बाळासाहेब ठाकरे नाव देण्याची मागणी म्हणजे मनसेचं निव्वळ नाटक आहे` अशी टीका शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी केलीय.

Jul 2, 2013, 03:37 PM IST

बाळासाहेबांच्या नावावरून मनसेचा नाशिकमध्येही वाद!

मुंबईमध्ये इस्टर्न एक्सप्रेसवेला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यावरून राजकारण सुरु असतानाच, नाशिकमध्ये शिवसेनेनं इतिहास संग्रहालयाला बाळासाहेबांच नाव देऊन नव्या वादाला तोंड फोडलंय.

Jul 1, 2013, 07:46 PM IST

‘फ्री वे’ अडवला… आरपीआय मनसेच्या वाटेवर?

मुंबईतल्या ‘ईस्टर्न एक्सप्रेस फ्री’वेच्या नामकरणावरून सध्या वाद सुरू आहे. ‘फ्री वे’ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी करत रिपब्लिकन पक्षानं फ्रीवेवर आंदोलन केलं.

Jun 30, 2013, 03:18 PM IST

ईस्टर्न फ्री वेला बाळासाहेबांचे नाव द्या- मनसे

मुंबईतल्या ईस्टर्न फ्री वेला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी मनसेनं केलीये. विधानसभेतले पक्षाचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिलंय.

Jun 29, 2013, 09:36 PM IST

महायुतीत चौथा भिडू नकोच- आठवले

महायुतीत चौथा भिडू नको यावर महायुतीतल्या जवळपास सर्वच पक्षांचं एकमत झाल्याचं दिसतंय. रामदास आठवलेंनीही मनसेला दूर ठेवण्याचा पुनरूच्चार केला आहे.

Jun 26, 2013, 05:55 PM IST

राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचं आव्हान

मनसे प्रमुख राज ठाकरेंना भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान दिलं आहे.

Jun 26, 2013, 03:46 PM IST

राज ठाकरे, अजित पवारांच्या विरोधातील याचिका मागे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मागे घेण्यात आली.

Jun 26, 2013, 09:26 AM IST

रामनगरीला राज ठाकरेंचाच विरोध

मुंबईतील मलबार हिल भागाचं नाव बदलून रामनगरी करण्याच्या मनसे गटनेते दिलीप लांडेंच्या मागणीला खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरेंनीच विरोध केला आहे.

Jun 25, 2013, 08:57 PM IST

राजना भाजपचा टोला, ‘कोणाची वाट पाहणार नाही’

भाजप, शिवसेना आणि आरपीआय महायुतीत कोणी येण्याची आता आम्ही वाट पाहणार नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.

Jun 25, 2013, 06:48 PM IST

मनसेवर पुन्हा बोलण्याची इच्छा नाही - उद्धव

मनसेच्या विषयावर पुन्हा बोलण्याची इच्छा नाही असं उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं. भाजपासोबत आमची युती ही हिंदुत्वाच्या मुद्यावर आहे. त्यामुळे युतीच्या विस्ताराचा निर्णय आम्ही परस्पर सहमतीनं घेऊ असं उद्धव यांनी सांगितलं. आरपीआय नाराज नसल्याचा खुलासाही त्यांनी केलाय.

Jun 25, 2013, 06:33 PM IST