राज ठाकरेंची सदिच्छा भेट – धनंजय मुंडे
मी बरेच दिवस भेटलो नव्हतो. ही केवळ सदिच्छा भेट होती, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज भेटीनंतर भाजप खासदार गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी आज दिली. त्याचवेळी त्यांनी हात जोडून पत्रकारांना सांगितले निवडणुकीचा या भेटीत मुद्दा नव्हता.
Aug 28, 2013, 01:57 PM ISTशिवसेना- मनसेमध्ये नेमकं काय शिजतंय?
परिस्थिती विपरित असली तरीही शिवसेनेच्या नेत्यांनी स्थानिक मनसे नेत्यांच्या भेटी घेत अध्यक्षपद मनसेला देण्याचं आश्वासन दिल्याची विश्व सनीय माहिती आहे त्यामुळे चमत्कार घडेल असा दावा शिवसेनं केलाय.
Aug 26, 2013, 06:47 PM ISTमनसे-राष्ट्रवादीच्या कार्येकर्त्यांत `तुंबळ` हाणामारी!
ठाण्यात शनिवारी मनसे आणि राष्टवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपसांत भिडले... निमित्त होतं आपल्या नेत्यांचा मान ठेवणं...
Aug 24, 2013, 10:23 PM ISTमुंबई बलात्कारावरून राजकारण सुरू
फोटो जर्नलिस्ट तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राजकीय नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केलीय. गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेल्या आर. आर. पाटलांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरलीय.
Aug 23, 2013, 09:21 PM ISTराज ठाकरे नाशिकमध्ये काय केलं - राणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ‘प्रहार’ केलाय. राज ठाकरे नाशिकमध्ये काय केलं, असा सवाल राणे यांनी विचारला आहे.
Aug 22, 2013, 04:54 PM IST‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यात झालेल्या हत्येचे पडसाद दिल्लीतही उमटले. दाभोलकर यांच्या हत्येनंतर दिल्लीतील अनेक वैज्ञानीक एकत्र आले आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला. ‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’, अशी त्यांनी मागणी केली.
Aug 22, 2013, 12:17 PM ISTसरकारचा जादूटोणा, सेना- मनसेची सावध भूमिका
समाजातील अंधश्रद्धेविरूद्ध लढणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर अखेर महाराष्ट्र सरकारला जाग आलीय. गेल्या १८वर्षांपासून रखडलेल्या जादूटोणा विरोधी विधेयकासंदर्भात वटहुकूम काढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय. वटहुकूमाला वारक-यांनी विरोध दर्शवलाय, तर शिवसेना, भाजप आणि मनसे या राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे.
Aug 22, 2013, 09:15 AM ISTकॉलेज विद्यार्थिनीची नाशिक मनपाला सणसणीत चपराक!
एकीकडे नाशिकमधल्या खड्ड्यांवरुन सत्ताधा-यांवर प्रचंड टीका होतेय. तरीही खड्डे नीट बुजवले जात नाहीत. त्याचवेळी नाशिकमधल्या कॉलेजच्या विद्यार्थिनीनं पॉकेटमनीमधून कॉलेजजवळचे खड्डे बुजवलेत.
Aug 21, 2013, 06:11 PM IST...नाहीतर खूनाचे बोट सरकारकडे जाते – राज ठाकरे
अख्या देशाला विचार देणारा हा महाराष्ट्र. अशा महाराष्ट्रात आणि तेही पुण्यासारख्या शहरात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होतो. हे दुर्दैव आहे. दाभोलकर यांच्या हत्येमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची भरून न निघणारी हानी झाली आहे. या खूनाचा तपास झालाच पाहिजे. ..नाहीत खूनाचे बोट सरकारकडे जाते, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
Aug 20, 2013, 04:50 PM ISTमनसेचा गुन्हेगारी स्वातंत्र्यसूर्य(वंशी)!
पुणे महापालिकेनं चक्क चोर, गुन्हेगारांचा सत्कार केलाय. तोही स्वातंत्र्य दिनी.... चोरी, गुन्हेगारीचे आरोप असलेल्या व्यक्तीला महापालिकेनं पुण्याच्या लौकिकात भर घालणारी नामवंत व्यक्ती म्हणून गौरवलंय. गुन्हेगारांच्या या सत्कारासाठी शिफारस केली होती ती, मनसेच्या नगरसेवकांनी...
Aug 19, 2013, 06:47 PM ISTखड्ड्यावरून मनसेचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण पुन्हा एकदा झोकात सुरु झालंय. कालपर्यंत खड्डे बुजत नाहीत म्हणून बोटं मोडणारी मनसे आता खड्डे बुजविले जातायेत म्हणून आपल्याच अधिका-यांविरोधात शंका उपस्थित करतेय.
Aug 17, 2013, 06:30 PM ISTराज ठाकरेंनी काढला शरद पवारांना चिमटा
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काय बोलतात ते सात आठ महिन्यांनंतर कळतं, ते नेमके काय बोलतील याचा नेम नाही असा चिमटा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढला.
Aug 14, 2013, 01:58 PM ISTमाण, खटावच्या चारा छावण्यांवरुन मनसे आक्रमक
साताऱ्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एस. पऱ्हाड यांच्या चारचाकी वाहनाची मनसेच्या चार कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली. तोडफोडीच्या निषेधार्थ महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आता जिल्हाभर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलंय.
Aug 12, 2013, 08:10 PM ISTमनसे नगरसेवकच नाशिकच्या महापौरांच्या विरोधात!
नाशिकला पाणी पुरवठा करणा-या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने शहरातील पाणी कपात रद्द करण्याची घोषणा महापौरांनी केली. या घोषणेला आठ दिवस उलटून गेलेत. मात्र अद्यापही प्रशासनाने पाणी कपात दूर केली नसल्याने हतबल मनसेच्या नगरसेवकांनीच आता आंदोलनाचा इशारा दिलाय.
Aug 10, 2013, 08:22 PM ISTमनसे आंदोलकांवर लाठीचार्ज, ४८ जणांना अटक
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील इंडियन ऑक्झिलेट कंपनीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलाच धडा शिकवला. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला. कंपनीवर धडक मारून गेट बंद आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी मनसेच्या ४८ कार्यकर्त्यांना अटक केली. तर ५० जणांवर गुन्हे दाखल केले. कोकण संघटक वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
Aug 6, 2013, 04:45 PM IST