मनसे आंदोलनाला परवानगी नाकारली, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. विना परवानगी आंदोलन केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलंय. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला.
Oct 4, 2013, 02:25 PM ISTक्लस्टर डेव्हलमेंट : सेनेचा लाँगमार्च तर मनसेचं उपोषण
क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी राष्ट्रवादी उपोषण करणार असून या मागणीसाठी शिवसेना आज टेंभिनाका ते मंत्रालय असा लाँगमार्च काढणार आहे तर मनसेनंही आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलाय.
Oct 3, 2013, 12:08 PM ISTबँकेत ४१२ कोटींचा घोटाळा, मनसे आमदार अडचणीत?
‘मुंबै बँके’मध्ये सुमारे 412 कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे अंतरिम तपासणी अहवालात उघडकीस आले आहे. मुंबै बँकेचे अध्यक्ष मनसेचे आमदार प्रवीण दरेकर आणि संचालक शिवाजी नलावडे यांच्यासह अन्य संचालकांवरही फौजदारी कारवाई करण्याची शिफारस अहवालात करण्यात आलीय.
Oct 2, 2013, 08:40 PM ISTशिवकालीन सुवर्ण नाण्यांचा लिलाव, मनसेचा विरोध
शिवकालीन सुवर्ण नाण्यांवरुन महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झालाय. मनसेनं या सुवर्ण नाण्यांच्या लिलावाला आक्षेप नोंदवत हा कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा दिलाय.
Sep 28, 2013, 04:57 PM ISTमनसेचे हर्षवर्धन करणार शिवसेनेत प्रवेश
मनसेतून बाहेर पडलेले कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेच्या दसऱा मेळाव्यात जाधव सेनेत प्रवेश करतील. यासंदर्भात आज जाधव यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
Sep 25, 2013, 05:12 PM ISTही मनसेवर नामुष्की आहे का?
नाशिक शहराचा प्रारुप विकास आराखडा अखेर रद्द करण्यात आलाय. आक्रमक विरोधक आणि शेतकऱ्यांपुढं सत्ताधारी मनसेला अखेर माघार घ्यावी लागली. पालिकेच्या महासभेत ११ तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर महापौरांनी प्रारूप आराखडा रद्द करण्याची घोषणा केलीय.
Sep 24, 2013, 01:23 PM ISTनरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं राजकारण करू नका - मुक्ता
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन एक महिना उलटला तरी तपास लागलेला नाही. याबाबत राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असताना नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं राजकारण करू नये असं आवाहन त्यांची मुलगी मुक्ता यांनी केली आहे. तर दाभोलकरांच्या हत्येचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे देण्याची मागणी आपण अजून केलेली नाही, असं हमीद दाभोलकर यांनी स्पष्ट केलंय. तशी मागणी अजून दाभोलकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली नाही.
Sep 20, 2013, 12:04 PM ISTदाभोलकरांच्या हत्येमागे सरकारचाच हात? - राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारवर तोफ डागली. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रश्नी तपास करण्यास सरकारला अपयश आले आहेत. या हत्याप्रकरणी सरकारबाबत संशय निर्माण होत आहे. त्यांचाच हात नाही ना, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
Sep 19, 2013, 12:32 PM ISTमनसेच्या इशाऱ्यानंतर इंग्रजी शाळा नरमल्या!
काँन्वेंट शाळांना गणेशोत्सवाची पाच दिवसांची सुट्टी द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केलीय. काँन्व्हेंट शाळांना गणेशोत्सवात सुट्टी दिली जात नाही. त्यामुळे मनविसे अधिक आक्रमक झाली आहे.
Sep 7, 2013, 03:00 PM ISTजैनांचं पर्यूषण, मांसाहाऱ्यांचं `उपोषण`!
जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वामुळे मांसाहार करणा-यांवर संक्रांत आलीय... जैन धर्मीयांनी केलेल्या विनंतीमुळे महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी 2, 9, 10 आणि 11 सप्टेंबरला मुंबईत कोणत्याही प्रकारच्या मांसविक्रीवर बंदी घातलीय...
Sep 4, 2013, 08:53 PM ISTजळगाव पालिकेत मनसे किंगमेकर, भूमिकेकडे लक्ष
जळगाव महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झालीय. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नसलं तरी सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीला सर्वात जास्त ३३ जागा मिळाल्या आहेत. तर मनसेनंही जोरदार मुसंडी मारत १२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळ सत्ता स्थापनेसाठी जैन आणि मनसे एकत्र येणार की मनसे-भाजप-राष्ट्रवादीचा नवा फॉर्म्युला अस्तित्वात येणार याबाबत उत्सुकता आहे.
Sep 3, 2013, 09:28 AM ISTराज्याचं डिझाइन बदलायचं असेल तर.... – राज ठाकरे
डिझाइन हे केवळ साड्या, दागिने, कपडे यांच्यासाठीच नसतं तर ते आपल्या सार्वजनिक जगासाठीही असतं. तुम्हांला बाहेरचाही तोच विचार केला पाहिजे. राजकारणातील सर्वांचे बंगले, फार्म हाऊस हे कसे चांगले असतात. त्यांना बाहेरचं विश्व का करावसं वाटत नाही. मी हे बोलू शकतो कारण माझ्या हातात सत्ता नाही, मी द्या असं सांगायला आलो नाही. समाजाचं डिझाइन बदलायचं असेल तर त्या डिझाइनमध्ये तुम्ही आले पाहीजे, असं आवाहन मनसेचे अध्यक्ष आणि आज पुरते झालेल्या राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना केलं.
Aug 31, 2013, 09:43 PM ISTमनसेच्या दहीहंडीला शिवसेनेची उपस्थिती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गो गो गोविंदाचा नारा देत आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीची दहीहंडीच्या मुहूर्तावर मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. याची झलक दादरमध्ये पाहायला मिळाली. चक्क दादरमध्ये मनसे, शिवसेना आणि भाजपमध्ये रंगीत तालीम दिसून आली. मात्र, यात मनसेनेने आपल्या दहीहंडी कार्यक्रमाला शिवसेना मंडळाना आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले.
Aug 30, 2013, 01:00 PM ISTपोटनिवडणुकीत आम्ही तटस्थ - राज ठाकरे
पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार तटस्थ राहणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.
Aug 29, 2013, 10:12 AM ISTश्रेयाच्या वादावरून सेना-मनसेत जुंपली
मुंबई महापालिकेच्या दहिसर इथल्या मुरबाळी जलतरण तलावाच्या भूमीपूजनाच्या श्रेयावरून मनसे आणि शिवसेनेत जुंपलीय.
Aug 28, 2013, 08:42 PM IST