मंगळ

यशस्वी मंगळ मोहिम आणि आनंदोत्सव

पहिल्याच प्रयत्नात भारताने मंगळयान मंगळाच्या कक्षेत पोहोचवून इतिहास घडवला आहे

Sep 24, 2014, 07:41 PM IST

यशस्वी 'मंगळ'झेपीनंतर सेलिब्रिटींचा 'इस्त्रो'वर शुभेच्छांचा वर्षाव

 भारतीय संशोधकांचं यश आणि मंगळावरील झेपीनंतर सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी इस्त्रोवर शूभेच्छांचा वर्षाव केलाय. ट्विटरवर #Mangalyaan करून अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Sep 24, 2014, 12:51 PM IST

मंगळयानावर कोणत्या सोपवण्यात आल्यात जबाबदाऱ्या

भारताचा मंगळयान जेव्हा मंगळाभोवती फिरुलागेल तेव्हा तो आपलं काम सुरु करेल. या मंगळयानावर कोणत्या जबाबदा-या सोपवण्यात आल्यात? त्यावर कोणत्या प्रकारची हायटेक यंत्रणा लावण्यात आलीये, याबाबत माहिती.

Sep 24, 2014, 07:54 AM IST

मंगळाविषयी महत्त्वाची माहिती पृथ्वीवर

24 तारखेनंतर भारताचा मंगळयान मंगळाच्या कक्षेत घिरट्या घालू लागेल आणि याच वेळी तो मंगळाविषयी महत्त्वाची माहिती पृथ्वीवर पाठवू लागेल. मंगळयान मंगळाच्या कक्षेत काय करेल आणि कशा प्रकारे ही माहिती आपल्याकडे  पाठवेल याबाबतचा एक खास रिपोर्ट.

Sep 24, 2014, 07:37 AM IST

मंगळयान मोहीम फत्ते, इस्त्रोचा ऐतिहासिक दिवस

मंगळयान आज 24 सप्टेंबरला मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. मंगळयानाच्या मुख्य लिक्विड इंजिनाची चाचणी यशस्वी झाली आणि आज सकाळी ७.२१ मिनिटांनी मंगळयान मंगळग्रहावर पोहोचले. अंतराळ मोहीमेच्या इतिहासात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) सुवर्ण अक्षरात नोंद करत पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मोहीम यशस्वी केली. सकाळी ७.४५ वाजता सुमारास मंगळयानाने मंगळाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश केला आणि मंगळ मोहीम फत्ते झाली. यामुळे इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. हे भारताचे मोठे यश आहे. जगातील मोजक्यात देशांमध्ये पंक्तित भारत जाऊन बसला आहे.

Sep 24, 2014, 07:25 AM IST

मंगळावर सर्वप्रथम वसाहत पृथ्वीवरील जिवाणूंची

मंगळावर जाण्याची स्वप्न पाहणाऱ्या मानवाला मंगळवार पाय ठेवतांनाही विचार करावा लागणार आहे. कारण मंगळावर पृथ्वीवरील जिवाणुंची सर्वप्रथम वसाहत असण्याची शक्यता आहे.

May 5, 2014, 02:09 PM IST

मंगळावर पाणी... हा घ्या पुरावा!

मंगळ... याच लालग्रहावर कित्येक वर्षांपूर्वी पाणी अस्तित्वात होतं... याचे धडधडीत पुरावेच आता नासाच्या हाती लागले आहेत. याच ग्रहावर कित्येक वर्षांपूर्वी जीवसृष्टीही अस्तित्वात होती, असा नासाचा कयास आहे.

Jan 25, 2014, 06:35 PM IST

‘मंगळ’वारीसाठी ६२ भारतीयांची निवड

मंगळ ग्रहावर एक कायमची कॉलनी वसविण्याच्या २०२४च्या एका खासगी महत्वाकांक्षी योजनेसाठी जगभरातून १००० व्यक्तींपेक्षा अधिकांची निवड करण्यात आली. या यादीत ६२ भारतीयांचा समावेश आहे.

Jan 3, 2014, 04:20 PM IST

मंगळ ग्रहावर जीवनाचे पुरावे मिळाले नाहीत- नासा

अमेरिकन अंतराळ संस्था नासानं मंगळावर पाठविलेल्या क्युरियॉसिटी रोव्हरनं गेले वर्षभर घेतलेल्या शोधानंतर मंगळावर पाण्याचे आणि जीवनाचे अवशेष आढळले नसल्याचं नासानं जाहीर केलंय. सायन्स र्जनलमध्ये ही माहिती प्रसिद्ध झाली आहे.

Sep 22, 2013, 04:54 PM IST

मंगळावर सुक्ष्मजीवांचं अस्तित्व?

अमेरिकेतील अंतराळ संस्था नासा हिने क्युरिऑसिटी रोव्हरने आणलेले मंगळ ग्रहावरील खडकांचे नमुने तपासले आहेत. यावरून मंगळ ग्रहावर पूर्वी सूक्ष्मजीवांचं अस्तित्व असल्याचे पुरावे मिळत आहेत.

Mar 13, 2013, 05:39 PM IST

मंगळावर वाहत होती नदी!

मंगळ ग्रहावर एकेकाळी १,५00 किमी लांब आणि सात किमी रुंदीची महाकाय नदी वाहन होती, असे दर्शविणारी विस्मयकारी छायाचित्रे गेल्या शुक्रवारी ‘युरोपियन स्पेस एजन्सी’च्या (ईएसए) ‘मार्स एक्स्प्रेस’ या यानाने पाठविली आहेत. एजन्सीने पाठविलेले हे यान मंगळाच्या सतत प्रदक्षिणा करीत असते.

Jan 21, 2013, 05:06 PM IST