भूखंड

अखेर सरकारी भूखंड राजीव शुक्ला यांनी केला परत

केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या संस्थेनं अखेर अंधेरी येथील कोट्यवधी रूपयांचा वादग्रस्त सरकारी भूखंड सरकार जमा केलाय. २००७ मध्ये राजीव शुक्ला यांच्या `बीएजी` या शिक्षण संस्थेला हा भूखंड देण्यात आला होता.

Feb 14, 2014, 01:55 PM IST

केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांची ३ कोटींची अजब मागणी

केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या संस्थेनं अखेर अंधेरी येथील कोट्यवधी रूपयांचा वादग्रस्त सरकारी भूखंड परत करण्याची तयारी दर्शवलीय. मुख्यमंत्री कार्यालयातूनच आज हा खुलासा करण्यात आलाय. आपलं राजकीय वजन वापरून घेतलेली जमीन वाद निर्माण झाल्यानंतर परत करण्याचं औदार्य केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी दाखवलं खरं... मात्र एक लाखात घेतलेली ही जमीन परत करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडेच ३ कोटी रुपयांची मागणी केलीये.

Feb 7, 2014, 09:07 PM IST

प्रतिभा पाटील, विलासराव यांचे भूखंड वादात

बड्या राजकीय नेत्यांच्या संस्थांना दिलेले भूखंड परत का घेण्यात येऊ नयेत, असा सवाल पुण्याच्या जिल्हाधिका-यांनी या संस्थाना पाठवलेल्या नोटिसांमध्ये विचारला आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, जयंत पाटील यांच्याशी संबंधित या संस्था आहेत.

Jun 12, 2012, 05:22 PM IST