विद्यार्थीनींवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला फाशीची शिक्षा
चीनमध्ये एका प्राथमिक शाळेत शिक्षकानं जवळपास 11 विद्यार्थिनींवर बलात्कार आणि छेडखानी केल्याच्या आरोप होता. या शिक्षकाला प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. गाओ दाओशेंग (59) वरील गुन्हा सिद्ध झालाय. तो वुवेई काउंटी शाळेत शिक्षक आहे.
Apr 23, 2014, 11:02 PM ISTबलात्कार करणाऱ्यांना फाशीपेक्षा कठोर शिक्षा द्या: अखिलेश यादव
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा फाशी बद्दल आपले मत मांडले आहे.
Apr 20, 2014, 04:15 PM ISTशिक्षा सुनावतानाही `ते` एकमेकांकडे पाहून हसत होते
शक्तीमिल फोटोजर्नलिस्ट गँगरेपप्रकरणी तिघांना फाशी सुनावण्यात आलीय. विजय जाधव, कासिम बंगाली आणि सलीम अन्सारी या तिघांना कोर्टानं फाशी सुनावली.... नेमकं काय घडलं कोर्टात...... हा निकाल सुनावताना कोर्ट काय म्हणालं आणि हा खटला इतर खटल्यांपेक्षा वेगळा का ठरला, त्याचाच हा रिपोर्ट...
Apr 4, 2014, 07:45 PM ISTबलात्काराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती; तिघांनाही फाशीची शिक्षा
दक्षिण मुंबईतल्या शक्ती मिल परिसरात एका फोटो जर्नालिस्ट तरुणीवर बलात्कार प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयानं दोषींना शिक्षा सुनावलीय.
Apr 4, 2014, 04:37 PM ISTअल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी फाशी कायम
नवी मुंबईत पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी दत्तात्रय रोकडे या नराधमाला सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे.
Mar 25, 2014, 07:23 PM ISTराजीव गांधींच्या मारेकऱ्यांना फाशी नाही, जन्मठेप
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
Feb 18, 2014, 11:00 AM ISTदया याचिकांवर निर्णयाला उशीर म्हणजे दोषींना मदत!
सुप्रीम कोर्टानं मंगळवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेल्या दोषींच्या दया याचिका अनिश्चित काळापर्यंत अनिर्णित ठेवल्या जाऊ शकत नाही. जर असा उशीर होत असेल तर अशा दोषींची शिक्षा कमी होऊ शकते, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.
Jan 21, 2014, 12:57 PM IST'त्या' क्रुरकर्म्याची फाशी कायम, न्यायालय म्हणतं...
पुण्यात बेदरकारपणे बस चालवून ९ जणांचा बळी घेणा-या संतोष मानेची फाशी सत्र न्यायालयानं कायम ठेवलीय.
Dec 11, 2013, 09:53 PM IST९ जणांचे बळी घेणाऱ्या संतोष मानेची फाशी कायम
बेदरकारपणे एस टी चालवून ९ जणांचे बळी घेणाऱ्या चालक संतोष माने याला दिलेली फाशीची शिक्षा कायम करण्यात आली आहे. संतोषची फाशीची शिक्षा आज पुणे सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली. खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, चोरी आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या गुन्ह्यांत त्याला आरोपी ठरविण्यात आले आहे.
Dec 11, 2013, 01:59 PM IST२६/११ : पाकचं न्यायालयीन पथक भारतात दाखल
मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा खटला पाकिस्तानातही सुरू आहे. याचसंबंधी आणखी काही जबाब नोंदविण्यासाठी पाकिस्तानचं एक न्यायालयीन पथक नुकतंच मुंबईत दाखल झालंय.
Sep 24, 2013, 01:18 PM ISTदिल्ली गँगरेप: आज निर्णय, फाशी की जन्मठेप?
दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ची काळरात्र... चालत्या बसमध्ये झालेल्या गँगरेप प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टानं काल चारही आरोपींना दोषी ठरवलंय. आज या चारही नराधमांना सकाळी ११ वाजता शिक्षा सुनावली जाणार आहे. चौघा आरोपींना जास्तीत जास्त फाशी आणि कमीत कमी जन्मठेप होऊ शकते. या घटनेमुळं देशभरात खळबळ उडाली होती आणि सरकारनंही पुढाकार घेत कडक बलात्कारविरोधी कायदा आणला होता.
Sep 11, 2013, 08:26 AM ISTदिल्ली गँगरेप: चारही आरोपी दोषी, उद्या शिक्षा सुनावणार
दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ला झालेल्या गँगरेप आणि हत्ये प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टातील सुनावणी आता पूर्ण झाली आहे. कोर्टानं चारही आरोपींना दोषी ठरवलं असून याबाबतची शिक्षा कोर्ट उद्या सुनावणार आहे.
Sep 10, 2013, 01:27 PM ISTआसाराम बापूंना फासावर लटकवा, पीडित मुलीच्या वडिलांची मागणी
आसाराम बापू यांच्याकडून आपल्या मुलीच्या जीवाला धोका असल्याचं पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलंय. या घटनेबद्दल घरी सांगितल्यास संपूर्ण कुटुंबाला उद्धस्त करण्याची धमकी बापूंनी दिल्याचं ते म्हणाले. शिवाय त्यांच्या शिष्यांकडून केस मागे घेण्याबाबत आपल्यावर दबाव येत असल्याचंही पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलंय. आसाराम बापूंना अजूनपर्यंत अटक का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Aug 28, 2013, 12:39 PM IST'ऑनर किलिंग' प्रकरणातील आरोपींची फाशी रद्द
ऑनर किलींगमधील सात आरोपींची उत्तर प्रदेशातील न्यायालयाने सहीसलामत सुटका केलीय. बदायू जिल्हाच्या गुन्नौर या परिसरात एका जोडप्याचे तुकडे करून आणि जाळून टाकल्याच्या गुन्ह्यामधील सात आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द केलीय.
Jul 14, 2013, 01:26 PM ISTअपहरण, रेप आणि खून करणाऱ्या दोघांना फाशीची शिक्षा!
एका १९ वर्षाच्या युवतीचे अपहरण, रेप आणि खून करण्याच्या आरोपाखाली २ आरोपींना नागपूरच्या सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा ठोठावली. अमर सिंह ठाकूर आणि राकेश कांबळे ही या प्रकरणातील आरोपींची नावे असून नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यातील लोणार गावात ही घटना घडली होती.
Jun 28, 2013, 07:08 PM IST