अजितदादांचा झंझावाती दौरा
अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये झंझावाती दौरा करून अनेक विकासकामांचा आढावा घेतला.. तर काही कामांचं उद्घाटन केलं. वरकरणी हा अजित पवारांचा हा दौरा नियोजित वाटत असला तरी शहरात गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी असल्याचं स्पष्ट झालंय.
Nov 4, 2012, 06:47 PM ISTविनीलची धूम; अवघ्या ३६ तासांत 'पुणे ते तामिळनाडू'
तुफान वेगाशी सामना करत विनील खारगे या बाईकरनं फक्त ३६ तासांत पुणे ते तामिळनाडू असा तब्बल चोवीसशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय. त्याच्या या विक्रमाची नोंद अमेरिकेच्या ‘आर्यन बट या बायकिंग असोसिएशन’नं घेतलीय.
Oct 9, 2012, 01:00 PM ISTक्रीडा संकुलांची दुरवस्था
पिंपरी चिंचवडमधल्या बहुसंख्य क्रीडा संकुलांची दुरवस्था झाल्यानं खेळाडूंना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. शहरातल्या भर वस्तीत असलेलं इनडोअर कुस्ती संकुलही त्याला अपवाद ठरलेलं नाही.
Oct 6, 2012, 06:53 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये धावणार मेट्रो
पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत मेट्रो प्रकल्प राबवायला सर्वसाधारण सभेनं मंजुरी दिलीय. पिंपरी चिंचवड पालिका भवन ते स्वारगेट या मार्गाची लांबी 16 किलोमीटर इतकी आहे. तसंच या मार्गावर एकूण 15 थांबे असतील
Sep 25, 2012, 08:20 AM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये स्फोट
पिंपरी-चिंचवडमध्ये एक छोटा स्फोट झालाय. डांगे चौकातल्या मार्केटसमोर ही घटना घडलीय. मात्र स्फोटाच्या कारणाचा उलगडा अजून झालेला नाही. या स्फोटात एक लहान मुलगा जखमी झाल्याची माहिती आहे.
Aug 17, 2012, 05:12 PM ISTअतिक्रमणविरोधात नागरिकांची दगडफेक
कुठल्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणारच, असं म्हणत पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तांनी त्यांची ठाम भूमिका जाहीर केली होती. लगेचच आज दिघीमध्ये हातोडा पडायला सुरुवातही झाली.
Aug 9, 2012, 08:45 AM ISTशिवसेनाही पिंपरीतील अतिक्रमणाच्या विरोधात
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक भूमिका घेत आहेत, हे लक्षात आल्यानंतर आता शिवसेनेनही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
Aug 8, 2012, 07:18 AM ISTपुण्यात CCTV; गोळा करणार ३० कोटी रुपये
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
Aug 5, 2012, 03:23 PM ISTअजित पवारांना धमकी, राष्ट्रवादीत खळबळ
पिंपरी चिंचवड मध्ये आयुक्तांना आलेल्या धमकी पत्रात अजित पवार यांचा उल्लेख आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या घटनेचा निषेध केलाय. आम्ही या धमक्यांना घाबरत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट केलंय.
Jul 28, 2012, 04:36 PM ISTआयुक्तांना धमकी, अजितदादांना आव्हान?
पिंपरी चिंचवडमध्ये आयुक्त श्रीकर परदेसी यांना जीवे मारण्याची धमकी देणार पत्र मिळाल्यामुळ एकाच खळबळ उडाली असली तरी आता या मुद्द्यावर राजकीय रंग चढू लागले आहेत. ही धमकी जरी आयुक्तांना असली तरी अप्रत्यक्षपणे हे आव्हान दादांनाच असल्याची चर्चा आहे.
Jul 22, 2012, 06:37 PM ISTखुर्च्यांना चिकटले पालिकेचे अधिकारी!
प्रशासनावर पकड म्हणूनच ख्याती असलेल्या अजित पवार यांच्या या महापालिकेत मात्र प्रशासनातील अनेक अधिकारी कित्येक वर्ष एकाच जागी काम करत असल्याचं समोर आलंय. काही अधिकारी तर महापालिकेत रुजू झाल्यापासून २७ वर्ष एकाच ठिकाणी चिकटून असल्याचं स्पष्ट झालंय.
Jul 4, 2012, 08:35 PM ISTअपघातांना आमंत्रण देणारा उड्डाणपूल
'एकहाती सत्तेमुळे पिंपरीचा विकास करु शकलो', असं उदाहारण अजित पवार नेहमीच देतात. पण याच विकासकामांमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार झालाय याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत.
Jun 14, 2012, 08:31 PM ISTप्रशासनाचा व्यर्थ अर्थसंकल्प...
पिंपरी-चिंचवडमध्ये ज्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तीन महिन्यापूर्वीच सुरु झालीय तो अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. महापालिकेचा अर्थसंकल्प २,८६२.५४ कोटी रुपयांचा असणार आहे. विशेष म्हणजे हा अर्थसंकल्प प्रशासनानं सादर केल्यामुळं त्यामध्ये नगरसेवकांची कोणतीही भूमिका नव्हती.
Jun 13, 2012, 08:21 PM ISTतीन प्राध्यापकांचा बुडून मृत्यू
रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या समुद्रात तीन प्राध्यापकांचा बुडून मृत्यू झालाय. हे तिघंही पिंपरी चिंचवडच्या वायआयटी कॉलेजचे प्राध्यापक असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 10, 2012, 10:37 PM ISTगड सर झाला पण...
... पण ‘सागरमाथा’च्या यशाला दुख:ची एक झालर होती. ज्या रमेश गुळवेंनी एव्हरेस्ट सर करण्याची मोहीम आखली होती त्यांचाच या मोहिमेदरम्यान मृत्यू झाला.
May 21, 2012, 11:57 AM IST