पाकिस्तान

शिवसेनेच्या बीसीसीआय आंदोलनाच्या भूमिकेला भाजपचा विरोध, आता दिल्लीत बैठक

शिवसेनेच्या पाकिस्तान विरोधाचा फटका आज बीसीसीआयला बसला. भारत-पाकिस्तान क्रिकेटला विरोध करण्यासाठी शिवसैनिकांनी थेट बीसीसीआय ऑफिसात घुसून धिंगाणा घातला. 

Oct 19, 2015, 07:28 PM IST

बीसीसीआयमध्ये धुडगूस घालणाऱ्या १० शिवसैनिकांना अटक

मुंबईत आज रद्द झालेली पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यातली बैठक आज दिल्लीत होणार आहे. मुंबईत बीसीसीआयच्या कार्यालयात धुडघुस घालून शिवसैनिकांनी पाक विरोधी भूमिका घेतली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी १० शिवसैनिकांना अटक केली आहे. 

Oct 19, 2015, 04:09 PM IST

व्हिडिओ: पाकिस्तानातील हिंदूंवरील अत्याचाराची सत्यकथा पाहा

पाकिस्तानात आजही २ टक्के हिंदू लोकं राहतात... पाकिस्तानात अल्पसंख्यांना काहीही त्रास होणार नाही हे फाळणीच्या वेळी मोहम्मद जिन्ना यांनी दिलेलं वचन पाळलं गेलं नाहीय. पाकिस्तानात हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवर किती अत्याचार होतात हे समोर आलंय.

Oct 18, 2015, 05:47 PM IST

पाकिस्तानचं आदरातिथ्य स्वीकारलं, तेव्हा कुठे गेला राष्ट्रधर्म - दानवे

सध्या भाजप-शिवसेना वादावर पडदा पडला असतांना संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपकडून उत्तर येतंय. पाकिस्तानला आता विरोध करणारे संजय राऊत दोन वेळा तिथं जाऊन आले. त्यांचं आदरातिथ्य स्वीकारून आले. तेव्हा त्यांना समजलं नाही का पाकिस्तान देशाचा शत्रू आहे. तेव्हा कुठं गेला होता त्यांचा राष्ट्रधर्म, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी लगावलाय. 

Oct 15, 2015, 10:12 PM IST

पाकिस्तानात राहणारी गीता भारतात आपल्या घरी परतणार

पाकिस्तानमध्ये राहणारी मूकबधीर मुलगी गीता लवकरच भारतात परतणार आहे, गीता दहा वर्षांआधी नकळतपणे सीमापार करून पाकिस्तानात आली होती.

Oct 15, 2015, 03:59 PM IST

'पाकिस्तानी' होते म्हणून... कुटुंबानं रात्र स्टेशनवर काढली

पाकिस्तानचे नागरिक आहेत म्हणून एका कुटुंबाला मुंबईतल्या हॉटेल्सनं रुम नाकारल्याचं समोर आलंय. 

Oct 15, 2015, 02:08 PM IST

अडवाणींनी पाककडून दाऊदला मागितल्याने आग्रा शांती चर्चा निष्फळ - कसुरी

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसुरू यांनी आग्र्यामध्ये झालेली शांती चर्चा निष्फळ ठरण्याला भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना जबाबदार धरले आहे. अडवाणी यांनी दाऊद इब्राहिमला भारताकडे सोपविण्याची मागणी केली होती, त्यामुळे आग्र्यातील शांती बैठक रूळावरून घसरल्याचा खुलासा कसुरी यांनी केला आहे. 

Oct 15, 2015, 01:27 PM IST

'माझ्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभं करण्याचा कुणालाही अधिकार नाही'

पाकिस्तानच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक भारताकडून व्हायला हवं, असं म्हणणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसरुद्दीन शाह यांच्यावर बरीच टीका झाली. यानंतर, एका वर्तमानपत्राशी बोलताना नसरुद्दीन शाह यांनी आपण मुस्लिम असल्याकारणानंच आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचं म्हटलंय. 

Oct 15, 2015, 12:36 PM IST

पाकिस्तान भारतात प्रत्येक घरात पाठवतोय 'नोट बॉम्ब'

भारताची अर्थव्यवस्था ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची मजबूत अर्थव्यवस्था सध्या मानली जात आहे. ही अर्थव्यवस्था कमकूवत करण्याची योजना पाकिस्तानने आखली आहे. 

Oct 14, 2015, 09:35 AM IST

सावधान! भारतातील प्रत्येक घरात पोहोचतोय पाकिस्तानी 'नोट बॉम्ब'!

भारत जगातील मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताविरुद्ध पाकिस्तान नवनवे कट-कारस्थान करतच असतो. आता पाकिस्तानच्या आयएसआयनं भारतातील सर्व जनतेला टार्गेट करण्यासाठी नवीन प्लान आखलाय.

Oct 13, 2015, 10:51 PM IST

व्हिडिओ: पाहा कसा हाफिज सईद पाकिस्तानात मुलांना बनवतो दहशतवादी

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद पाकिस्तानात शाळा चालवतो. पण शाळांमध्ये मुलांना दहशतवादाचं कसं ट्रेनिंग दिलं जातंय. पाहा... 

Oct 12, 2015, 08:18 PM IST

VIDEO - 'भारत म्हणजे उंदराचं डोकं असलेला हत्ती' पाकिस्तानी अँकरनं ओकली गरळ

एकीकडे भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी विविध पातळीवर चर्चेचा प्रयत्न होतो. तर दुसरीकडे देशांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम अनेक जण करतात. आता तर एका पाकिस्तानी टिव्ही अँकरनं 'भारत हा उंदराचा मेंदू असलेला हत्ती आहे' असं धक्कादायक वक्तव्य केलंय.

Oct 11, 2015, 04:35 PM IST