फायलिनला भारताने हरवलं
फायलिनला भारताने हरवलं आहे. शनिवारी ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीवर धडकलेल्या फायलिन चक्रीवादळाचा वेग मंदावलाय. गोपालपूरमध्ये वारे आता ताशी 90 ते 100 किमी वेगाने वारे वाहत आहेत.
Oct 13, 2013, 01:16 PM ISTफायलीन चक्रीवादळाचा वेग वाढलाय
फायलीन चक्रीवादळाचं काउंटडाऊन सुरु झाले आहे. फायलिनचा वेग आणखी वाढला आहे. हे वादळ ओडिशाच्या भोपालपूरपासून ३४५ किमी दूर आहे. आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हे वादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय.
Oct 12, 2013, 09:50 AM ISTफायलीन चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशला धोका
फायलीन चक्रीवादळाचा वेग आणखीन वाढलाय. सध्या हे चक्रीवादळ पश्चिमोत्तर दिशेने पुढे जात असून, हे वादळ ओडिशातील पारादीपपासून ८५० किलोमीटरवर केंद्रीत आहे. उद्या रात्री हे वादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामानखात्यानं दिलीये.
Oct 11, 2013, 03:54 PM ISTआंध्र प्रदेश अंधारात, तेलंगणविरोधी आंदोलन कायम
स्वतंत्र राज्य तेलंगण निर्मितीला मंजुरी मिळाल्यानंतर आंध्रमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. जाळपोळ यासारख्या घटनानंतर आता वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विजयनगरसह अनेक भाग अंधारात बुडाले आहेत. दरम्यान, तेलंगणविरोधकांच्या आंदोलनाची धग आजही कायम आहे.
Oct 8, 2013, 11:51 AM ISTआंध्रच्या विभाजन मुद्दयावरून सीमांध्रामध्ये असंतोष
आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या मुद्दयावरून सीमांध्रामध्ये असंतोष पसरला आहे.. सरकारने विभाजन मागेघ्यावं या मुद्द्यासाठी वायएसआर काँग्रेसचे नेते वाय.ए. जगन मोहन रेड्डी यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. वाय.एस.आर. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरच ते उपोषणाला बसलेत.
Oct 5, 2013, 02:39 PM ISTआंध्र प्रदेशात तीन अतिरेकी घरात घुसले
आंध्र प्रदेशात घरात दहशतवादी घुसल्याने घबराट पसरली आहे. आंध्र प्रदेशच्या चित्तूरमध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. इथल्या एका घरात २-३ दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या घराला घेरलं आहे.
Oct 5, 2013, 12:26 PM ISTस्वतंत्र तेलंगणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वतंत्र तेलंगणा राज्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी जाहीर केलं.
Oct 3, 2013, 08:19 PM ISTमहाराष्ट्राचा नवा शेजारी... `तेलंगणा`!
स्वतंत्र तेलंगणासाठी सुरू असलेल्या साठ वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. युपीए समन्वय समितीच्या बैठकीत स्वतंत्र तेलंगणाबाबत एकमतानं निर्णय घेण्यात आला.
Jul 30, 2013, 08:36 PM ISTस्वतंत्र तेलंगणाच्या औपचारिक घोषणेची शक्यता
स्वतंत्र तेलंगणाचा निर्णय आजच्या यूपीए समन्वय समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
Jul 30, 2013, 10:51 AM ISTपी.साई संदीप JEE अॅडव्हान्स प्रवेश परीक्षेत पहिला
आंध्र प्रदेशातल्या पी.साई संदीप रेड्डीनं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT साठी घेण्यात आलेल्या JEE अडव्हान्स प्रवेश परीक्षेत पहिला येण्याचा मान पटकावलाय.
Jun 22, 2013, 06:56 PM ISTसुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्राच्या बाजूने निकाल
महाराष्ट्र-आंध्र प्रदेशच्या सीमेवर असलेल्या बाभळी बंधाराच्या बाधकामाविरोधातली आंध्राची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळं महाराष्ट्राला दिलासा मिळाला असून बाभळीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Feb 28, 2013, 09:42 PM ISTआंध्र, तामिळनाडूला वादळाचा धोका
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत जोरदार वादळ घुसण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासात तुफानी वादळाचा सामना करावा लागेल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
Dec 29, 2011, 12:37 PM IST