नागपूर : ४० वर्षांच्या वसीम जाफरनं क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक रन करणारा वसीम जाफर या रणजी मोसमातही खोऱ्यानं रन काढत आहे. उत्तराखंडविरुद्धच्या रणजी क्वार्टर फायनलमध्ये वसीम जाफरनं द्विशतक झळकावलं आहे. ४० वर्षांचा झाल्यानंतर २ द्विशतकं झळकावणारा जाफर हा पहिला भारतीय आणि पहिला आशियाई बॅट्समन बनला आहे. विदर्भाकडून खेळताना वसीम जाफरनं २९६ बॉलमध्ये २०६ रन केले. वसीम जाफर आणि शतक करणारा संजय रामासॅमी यांच्यामध्ये ३०४ रनची पार्टनरशीप झाली. या दोघांच्या पार्टनरशीपमुळे विदर्भाला पहिल्या इनिंगमध्ये महत्त्वाची आघाडी मिळाली. उत्तराखंडनं पहिल्या इनिंगमध्ये ३५५ रन केले होते.
वयाची ४० वर्ष पूर्ण केल्यानंतरचं जाफरचं हे दुसरं द्विशतक होतं. याआधी २०१७-१८ साली जाफरनं रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध द्विशतक केलं होतं. ती मॅच ड्रॉ झाली होती. यानंतर आत्ता केलेली २०६ रनची खेळी जाफरचं नववं द्विशतक होतं. याचसोबत जाफरच्या नावावर ३ त्रिशतकंही आहेत.
२००८ साली वसीम जाफर भारताकडून शेवटची मॅच खेळला होता. या रणजी ट्रॉफी मोसमातही वसीम जाफर १ हजार रनच्या जवळ आहे. विदर्भाकडून तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या जाफरनं या रणजी मोसमात आत्तापर्यंत ९६९ रन केले आहेत. यामध्ये ४ शतकं आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. वसीम जाफरनं ९ मॅचमध्ये ८०.७५ च्या सरासरीनं एवढ्या रन केल्या आहेत.
रणजी ट्रॉफीमध्ये १० हजारांपेक्षा जास्त रन करणाऱ्या वसीम जाफरनं २०१५-१६ साली मुंबईऐवजी विदर्भाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. २०१७-१८ साली विदर्भाला रणजी ट्रॉफी जिंकवण्यात वसीम जाफरनं मोलाचं योगदान दिलं होतं.
Wasim Jaffer 200* - Vidarbha vs Uttarakhand @ Nagpur #RanjiTrophy 2018-19 QF
His ninth 200+ fc score, incl two 300+ scores!
314* for Mumbai
218 for India A
267 for Mumbai
212 for India
202 for India
256 for Mumbai
301 for Mumbai
286 for Vidarbha
200* for Vidarbha#VidvUtt— Mohandas Menon (@mohanstatsman) January 17, 2019
३१४ रन नाबाद मुंबईसाठी
२१८ रन भारत एसाठी
२६७ रन मुंबईसाठी
२१२ रन भारतासाठी
२०२ रन भारतासाठी
२५६ रन मुंबईसाठी
३०१ रन मुंबईसाठी
२८६ रन विदर्भासाठी
२०६ रन विदर्भासाठी