इंग्लंड सीरिजआधी भारताचं टेन्शन वाढलं, विराटची बॅट शांतच

इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी भारताचं टेन्शन वाढलं आहे.

Updated: Jun 30, 2018, 08:33 PM IST
इंग्लंड सीरिजआधी भारताचं टेन्शन वाढलं, विराटची बॅट शांतच title=

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी भारताचं टेन्शन वाढलं आहे. कारण भारताचा कर्णधार आणि भरवशाच्या विराट कोहलीची बॅट अजूनही तळपलेली नाही.  आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-२० मॅचची सीरिज ही इंग्लंड दौऱ्याआधी सराव मानली जात होती. पण या सीरिजमध्ये विराट कोहलीनं फक्त ९ रन केले. यातल्या पहिल्या टी-२० मध्ये तर विराट शून्य रनवर आऊट झाला. पीटर चेजनं विराटला माघारी पाठवलं. दुसऱ्या टी-२० मध्ये विराट ओपनिंगला आला होता. पण या मॅचमध्ये विराटला ९ रन करता आले. मागच्या ५ टी-२० इनिंगमध्ये विराट अयशस्वी होत आहे. १३, २६,, १, ० आणि ९ हे विराटचे स्कोअर आहेत. मागच्या ५ इनिंगमुळे विराटची टी-२० मधली सरासरी ५० पेक्षा कमी आली आहे. विराट कोहलीची सरासरी ५२.१५ वरून ४८.५८ वर आली आहे. 

विराटचं इंग्लंडमधील अपयश

२०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट कोहली अयशस्वी ठरला होता. ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये विराटला एकही अर्धशतक बनवता आलं नव्हतं. ५ टेस्ट मॅचमध्ये विराटनं १, ८, २५, ०, ३९, २८, ०, ७, ६ आणि २० रन केल्या. या रन विराटनं १३.५० च्या सरासरीनं रन केले होते. तर वनडेमध्ये विराटनं ०, ४०, १ नाबाद आणि १३ रन केल्या होत्या.