अंडर १९ वर्ल्ड कप : टीम इंडियावर 'पराभवाचे सावट', हे आहे कारण

भारताचा पगडा भारी आहे. पण हा सामना भारतासाठी चिंताजनक ठरणारादेखील असू शकतो. यामागचा दुर्देवी योगायोगही तेच सांगतोय. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 2, 2018, 04:00 PM IST
अंडर १९ वर्ल्ड कप : टीम इंडियावर 'पराभवाचे सावट', हे आहे कारण title=

नवी दिल्ली : न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये शनिवारी भारताचा सामना ऑस्ट्रेलियासोबत होत आहे. टीम इंडियाने ग्रुप सामन्यात याआधी ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे.अशावेळी भारताचा पगडा भारी आहे.

पण हा सामना भारतासाठी चिंताजनक ठरणारादेखील असू शकतो. यामागचा दुर्देवी योगायोगही तेच सांगतोय. 

टीम इंडिया प्रबळ दावेदार 

टीम इंडियाच्या खेळाडूंनी सर्व फॉर्मेटमध्ये जबरदस्त खेळ करून सर्वांची मनं जिंकली आहेत. यावेळी टीम इंडिया विजयाची प्रबळ दावेदार मानली जाते. पण एक दुर्देवी संयोग भारताची चिंता वाढविणारा आहे. या संयोगाची सावली टीम इंडियावर आहे. 
  
टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी वर्ल्ड कपमध्ये आपली ओळख बनविली आहे.

२०१७ हे वर्ष टीम इंडियासाठी खास राहिले. त्याच वर्षात टीम इंडियाच्या महिला संघाने विश्व चषक आणि आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हार पत्करावी लागली. 

चॅम्पियन्स ट्रॉफी गेली 

विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीत जागा बनवली पण त्यानंतर पराभवाला सामोरे जावे लागले. 

इंग्लंडने हरविले 

महिला वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या नेतृत्वात इग्लंडविरूद्ध हार पत्करावी लागली. 

वर्ल्ड कप जिंकणार ?

याच पार्श्वभूमीवर अंडर १९ वर्ल्ड कप २०१८ मध्ये टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे. विशेष म्हणजे अंडर १९ वर्ल्ड कपच्या इतिहासात केवळ भारतानेच ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. यापूर्वी २०१२ मध्ये अंडर १९ च्या वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही संघाचा सामना झाला होता. त्यावेळी भारताने कांगारूंना ६ विकेटने पराभूत केले होते. ही अशी पहिली वेळ होती की ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये कोणीतरी पराभूत केले होते.

टीम इंडियाने सहा वेळा या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यात २००२, २००६, २००८, २०१२ आणि  २०१६ फायनल गाठली होती.. यातील तीन वेळा भारताने खिताब पटकावला होता. अंडर १९ वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलियाने ३-३ वेळा कप जिंकला आहे. ऑस्ट्रलियाने १९८८, २००२ आणि २०१० भारताने २०००, २००८ आणि २०१२ खिताब आपल्या नावावर केला होता. टीम इंडियाला २००६ आणि २०१६ ला फायनलमध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. 

आता पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कसे प्रदर्शन करते हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.