"टीम इंडियाला रोहित, विराट नाहीतर 'हा' खेळाडू जिंकून देणार टी-20 वर्ल्ड"

ज्याला संघातून काढण्याची मागणी झाली तो खेळाडू भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणार?

Updated: Oct 2, 2022, 03:18 PM IST
"टीम इंडियाला रोहित, विराट नाहीतर 'हा' खेळाडू जिंकून देणार टी-20 वर्ल्ड" title=

India Team For T20 World Cup 2022 :  येत्या काही दिवसांवर वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2022) थराराला सुरूवात होणार आहे. भारतीय संघामध्ये अनेक प्रयोग करण्यात आले. आशिया कपमध्ये भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र भारताचा पराभव झाला. आशिया कपमधून (Asia Cup 2022) भारत बाहेर पडल्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. भारताचा सलमीवीर के. एल. राहुल (K. L. Rahul) पूर्णपणे प्लॉप गेला होता. राहुलला संघातून बाहेर काढा अशीही मागणी होत होती मात्र ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनने (Shane Watson) के. एल . राहुलचं समर्थन केलं असून टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी राहुल गेमचेंझर ठरणार असल्याचं म्हटलं आहे. (Shane Watson on indian team player KL Rahul latest marathi news)

काय म्हणाल शेन वॉटसन: 
के. एल. राहुल हा माझा आवडता खेळाडू आहे. राहुल त्याच्या लयीमध्ये खेळायला लागला की त्याची फलंदाजी बहरत जाते त्यावेळी त्याची बॅटींग पाहायला आणखी मजा येते. राहुलला आक्रमक पवित्रा घेतो तेव्हा पूर्ण खेळ त्याच्या नियंत्रणात असतो. मॅचमध्ये गमावण्यासारखं काहीच नसतं तेव्हा राहुलची बॅटींग अधिक आक्रमक होते. त्यावेळी तो सहज 180 च्या स्ट्राईक रेटने धावा काढतो तसं असेल त्याला ऑस्ट्रलियामध्ये तो बॉलर्सला अडचणीमध्ये आणू शकतो, असं  शेन वॉटसन म्हणाला. 

शेन वॉटसनचा राहुलला सल्ला 
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डमध्ये राहुलने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत फलंदाजी करायला हवी, असा सल्लाही वॉटसनने राहुलला दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T-20 सामन्यात भारताला फक्त 107 धावांचं लक्ष्य गाठायचं होतं, पण राहुलने अतिशय संथ फलंदाजी करत 56 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या.

दरम्यान, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. यावर शेन वॉटसन म्हणाला, भारताकडे निश्चितच फलंदाज आहेत जे ऑस्ट्रेलियन परिस्थितीत चांगली कामगिरी करू शकतात, पण सर्वात मोठा प्रश्न त्यांच्या वेगवान गोलंदाजीबाबत आहे.