IPL 2021 पाठोपाठ आता ऑलिम्पिकवरही कोरोनाच मोठं संकट, रद्द होण्याची शक्यता

कोरोनाने जगभरात खळबळ उडाली आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे जपानने आपले लॉकडाऊन वाढवलं आहे.

Updated: May 6, 2021, 02:05 PM IST
IPL 2021 पाठोपाठ आता ऑलिम्पिकवरही कोरोनाच मोठं संकट, रद्द होण्याची शक्यता title=

मुंबई: जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. दर भारतात दुसऱ्या लाटेमध्ये IPL 2021मध्ये कोरोनानं शिरकाव केला आणि खेळाडू विळख्यात सापडले आहेत. एकामागोमाग एक खेळाडू-कोच कोरोना पॉझिटिव्ह होऊ लागल्यानंतर BCCIला IPLचे पुढचे सामने स्थगित करावे लागले आहेत. तर सर्व खेळाडूंना आपल्या घरी जाण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. 

कोरोनाने जगभरात खळबळ उडाली आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे जपानने आपले लॉकडाऊन वाढवलं आहे. त्यामुळे 23 जुलै 2021 पासून सुरू होणारे महाकुंभ ऑलिम्पिक रद्द होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतात IPL 2021 स्थगित करण्याची वेळ BCCIवर आली आहे. त्यामुळे याचा आणि वाढत्या कोरोनाचा परिणाम विदेशातील खेळ आणि ऑलिम्पिकवरही होऊ शकतो. 

कठोर बायो बबल असून देखील IPLमध्ये खेळाडूंपर्यंत कोरोना पोहोचला. एक एक करत 4 खेळाडू तर 2 कोच कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तातडीनं सर्वांच्या सुरक्षेखातर IPL स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. खेळाडूंना आपल्य़ा घरी जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

जपानच्या अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. भारतासारखच तिथेही कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी आणखी लॉकडाऊन वाढवण्याबाबत तिथल्या अधिकाऱ्यांचा विचार सुरू आहे. त्यामुळे आता महाकुंभ ऑलम्पिकही रद्द होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.