मुंबई : आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने बुधवारी टीम इंडियाची घोषणा केली. हार्दिक पंड्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलं. यासह हार्दिक गेल्या वर्षभरातील टीम इंडियाचा सहावा टी 20 कॅप्टन ठरला. हार्दिकच्या नेतृत्वात आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) गुजरातने पदार्पणातच चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. हार्दिकला याच कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाचं कर्णधारपद देण्यात आलं. मात्र यासह बीसीसीआयचं सातत्याने कर्णधार बदलण्याचा निर्णय टीम इंडियाला आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये महागात पडणार का, अशी भिती व्यक्त केली जात आहे. (india tour of ireland 2022 bcci has change 6 captain in 12 months)
बीसीसीआयने शिखर धवनला गेल्या वर्षी कर्णधार बनवल. त्यानंतर सीनिअर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. तर श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाची कमान धवनला देण्यात होती.
या दौऱ्यावर टीम इंडियाला टी-20 मालिकेत 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी कर्णधार झाल्यानंतर शिखरची कारकीर्द धोक्यात आली. तेव्हाच तो टीम इंडियातून बाहेर पडला.
टीम इंडियाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भाग घेतला. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
टीम इंडियाला उपांत्य फेरीतही पोहोचता आलं नव्हतं. टी 20 वर्ल्ड कपनंतर नेतृत्व सोडणार असल्याचं विराटने आधीच जाहीर केलं होतं. त्यानुसार विराट पदावरुन पायऊतार झाला होता.
विराटनंतर रोहित शर्माला कर्णधारपद देण्यात आलं. रोहितने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला धमाकेदार विजय मिळवून दिले. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने वेस्टइंडिज, न्यूझीलंड आणि श्रीलंका या तिन्ही संघाना 3-0 अशा फरकाने पराभव केला होता. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.
रोहितला दुखापत झाल्याने आफ्रिका दौऱ्यावर केएल राहुलला कॅप्टन्सी देण्यात आली. राहुलच्या नेतृत्वात टीम इंडियाला सलग 3 टी 20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र केएलने आपल्या कामगिरीने सर्वांची मनं जिंकली होती.
सध्या दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया-आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेसाठी केएललाच कॅप्टन करण्यात आलं. मात्र दुखापतीने केएलची नेतृत्व करण्याची संधी हुकली.
केएलची दुखापत ऋषभ पंतच्या पथ्यावर पडली. टीम मॅनेजमेंटने पंतला नेतृत्वाची संधी दिली. पंतच्या नेतृत्वात पहिल्या 2 सामन्यात पराभव झाला. मात्र त्यानंतर तिसऱ्या मॅचमध्ये विजय मिळवत मालिकेतील आव्हान कायम ठेवलं.