'मला कपिल देवसारखं व्हायचं होतं, पण...' हरभजन सिंह याने केला मोठा खुलासा!

Harbhajan Singh in Goa Feast 2023: आगामी पुस्तकात काही खुलासे करणार असल्याचं म्हणत हरभजने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Updated: May 28, 2023, 06:05 PM IST
'मला कपिल देवसारखं व्हायचं होतं, पण...' हरभजन सिंह याने केला मोठा खुलासा! title=

Harbhajan Singh On Kapil Dev: टीम इंडियाचा माजी फिरकीपटू भज्जी म्हणजेच हरभजन सिंह (Harbhajan Singh) हा डिस्ने स्टारच्या ‘अनअर्थिंग फ्यूचर टॅलेंट: द राइज ऑफ इंडियन क्रिकेटर्स फ्रॉम द ग्रासरूट्स’ या नॉलेज सेमिनारमध्ये पोहोचला होता. या कार्यक्रमात हरभजनने अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. त्यावेळी हरभजन सिंग याने गोवाफेस्टमध्ये (Goa Feast 2023) क्रिकेट आयुष्यातील काही किस्सा शेअर केले आणि टीम इंडियाचे महान कॅप्टन कपिल देव (Kapil Dev) यांचं नाव घेत मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाला हरभजन सिंह?

भारताच्या यशात योगदान देऊ शकतील असे कुशल आणि स्पर्धात्मक खेळाडू सातत्याने तयार करण्याची क्षमता भारतात असल्याचं देखील हरभजनने म्हटलं आहे. अपयशातून शिकलेल्या गोष्टींबद्दल आणि त्याच्या खेळात अधिक चांगलं प्रदर्शन करण्यासाठी त्याचा कसा उपयोग केला यावर देखील हरभजनने भाष्य केलंय. त्यावेळी त्याने मोठा खुलासा देखील केला.

मी ज्युदो आणि बॅडमिंटनमध्ये हात आजमावला, पण क्रिकेट माझ्या हृदयाच्या खूप जवळ होतं, मला कपिल देवसारखं व्हायचं होतं, असा खुलासा हरभजन सिंह याने केला आहे. भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून तो एक धर्म आहे, क्रिकेट ही राष्ट्रीय आवड आहे, असंही हरभजन म्हणतो.

कोचिंग ही एक गोष्ट आहे, ज्यामध्ये प्रतिभेचे प्रामाणिक व्यवस्थापन ही आज गरज आहे. समर्पित प्रशिक्षण कार्यक्रम, पायाभूत सुविधांचा विकास आणि खेळाची आवड याद्वारे भारताचे युवा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवतील, असा विश्वास देखील हरभजन सिंह याने व्यक्त केला आहे.

आणखी वाचा - Harbhajan Singh : "...क्रिकेट आणि देश सोडण्याची का आली होती वेळ", हरभजन सिंहने केला 'त्या' क्षणाचा खुलासा

हरभजन सिंह याने यावेळी अनेक मुद्दयांवर भाष्य केलं. मैदानावरील आणि मैदानाबाहेरचे अनुभव, क्रिकेटच्या पलीकडे त्याचा प्रवास आणि त्याच्या आगामी पुस्तकावर देखील हरभजन स्पष्ट बोलला. आगामी पुस्तकात काही खुलासे करणार असल्याचं म्हणत हरभजने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.