काय....! सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंना कोणी दिला Sex करण्याचा सल्ला ?

 एका व्यक्तीनं संघातील खेळाडूंना वेगळाच सल्ला दिला होता. 

Updated: Jan 19, 2022, 12:58 PM IST
काय....! सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंना कोणी दिला Sex करण्याचा सल्ला ? title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : काही गोष्टी या एकमेकिंना पूरक असतात हा सिद्धांत कैक वर्षांपासून चालत आला आहे. व्यक्तीच्या मानसिक आरोग्य आणि स्थौर्यासाठीही काही गोष्टी गरजेच्या असतात. यासाठीच भारतीय क्रिकेट संघात असणाऱ्या एका व्यक्तीनं संघातील खेळाडूंना वेगळाच सल्ला दिला होता. (Cricket team india)

संघात प्रशिक्षकपदी असणाऱ्या या व्यक्तीनं खेळाडूंना सामन्यापूर्वी Sex अर्थात शरीरसंबंध ठेवण्याचा सल्ला दिला होता. 

हा सल्ला देणारी व्यक्ती म्हणजे संघाचे माजी मेंटल कंडीशनिंग कोच Paddy Upton. 

पॅडी अप्टन यांनी  'द बेयरफुट कोच' या पुस्तकातून सदर खुलासा केला. अप्टन यांनी दिलेला हा सल्ला पाहून तत्कालीन मुख्य प्रशिक्षक गॅरी कस्टर्न उार नाराज झाले होते. 

गॅरी कर्स्टर्न यांच्याच प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत 2011 मध्ये भारतीय संघानं एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. दरम्यान, आपल्या या सल्ल्यामुळं गॅरी नाराज झाल्याचं पाहून अप्टन यांनी त्यांची माफी मागितली होती. 

सेक्सच्या मुद्द्यावरून वाद 
पॅडी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सामन्यापूर्वी खेळाडूंना शरीरसंबंधांचा सल्ला दिला. पण हे त्यांनी एक माहिती म्हणून फक्त सांगितलं होतं. 

राजस्थानच्या संघात आयपीएलमध्ये प्रशिक्षकपदी होते अप्टन 
पुढे आपला हा सल्ला मोठी चूक असल्याचं अप्टन यांनी स्वीकारलं होतं. मी फक्त सांगत होतो, बाकी काही नाही असंच ते वारंवार म्हणाले. 

अप्टन आयपीएलमध्ये राजस्थानच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदीही होते. 

दरम्यान पॅडी यांनी आपल्या पुस्तकामध्ये शरीरसंबंधांचे फायदेही नमूद केल्याचं म्हटलं जात आहे. 

2009 मध्ये ते चॅम्पियन्स चषकाच्या तयारीदरम्यान, भारतीय संघासाठी काही मुद्दे लिहित होते. ज्यामध्ये त्यांनी Sex चे फायदेही लिहिले होते.

'ईगो अँड माय ग्रेटेस्ट प्रोफेशनल एरर' या मथळ्याअंतर्गत त्यांनी या मुद्द्यावर लिहिलं. शरीरसंबंधांमुळं तुमच्या प्रदर्शनावर याचा परिणाम होतो? हो प्रदर्शन चांगलं होतं, अशा आशयाचा तिथं त्यांनी उल्लेख केला आहे. 

सध्या पॅडी यांचा हा अजब सल्ला बराच चर्चेत आला आहे. मुख्य म्हणजे यावर आता खेळाडू कसे व्यक्त होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.