Year Ender 2022: या वर्षात 11 क्रिकेटर्स अडकले विवाह बंधनात, एक समलिंगी जोडपं
Crickerts Marriage : या वर्षी तब्बल अकरा क्रिकेटर्स विवाह बंधनात अडकले. या क्रिकेटर्सने आपला जोडीदार निवडला आणि सेकंड इनिंगला (Second Inning) सुरुवात केली. काही क्रिकेटर्सने आपल्या बालपणीच्या मैत्रिणीबरोबर लग्न केलं, तर काही विदेशी खेळाडूंनी भारतीय मुलीला आपला जीवनसाथी बनवलं. काहींनी 34 वर्षी लग्नगाठ बांधली तर काही 66 व्या वर्षी बोहल्यावर चढले. आपण एक नजर टाकूया 2022 मध्ये कोणत्या क्रिकेटर्सने लग्न केलं यावर.
1/8
हॅरिस रौफ - मुजान मलिक
2/8
ग्लेन मॅक्सवेल - विनी
ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) भारतीय वंशाच्या विनी रमनबरोबर मार्च 2022 मध्ये लग्न गाठ बांधली. ऑस्ट्रेलियात हा शानदार विवाह सोहळा पार पडला. IPL 2022 पूर्वी पार पडलेला हा लग्न सोहळा चांगलाच चर्चेत राहिला. मॅक्सवेल आणि विनीने भारतात येऊन 27 मार्चला दाक्षिणात्य पारंपारिक पद्धतीने सात फेरे घेतले.
3/8
दीपक चहर - जया भारद्वाज
दीपक चहर (Deepak Chahar) आणि जया भारद्वाजची लव्ह स्टोरी खूपच मनोरंजक आहे. दीपकने 2021 मध्ये जयाला लग्नासाठी मागणी घातली आणि 2022 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. टीम इंडिया (Team India) आणि सीएसकेचा (CSK) ऑलराऊंडर दीपक चहरने जया भारद्वाजबरोबर आगरा इथं लग्न केलं. दीपक चहरच्या लग्न सोहळ्यात एमएस धोणी, इशान किशन, ऋषभ पंत आणि शिखर धवन यांनी हजेरी लावली.
4/8
कॅथरीन ब्रंट - नॅट सीवर
5/8
अरुणलाल - बुलबुल
2022 मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेलं लग्न म्हणजे भारतीय क्रिकेट संघाजे ज्येष्ठ क्रिकटपटू अरुण लाल (Arun Lal) यांचं. वयाच्या 66 व्या वर्षी अरुण लाल यांनी दुसरं लग्न करण्याची घोषणी केली. या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अरुण लाल यांनी मैत्रिण बुलबुलसोबत कोलकातामध्ये लग्न केलं. विशेष म्हणजे अरुणलाल यांची पहिली पत्नी रीना यांची या लग्नाला संमती होती.
6/8
चरिथ असालंका, पाथम निसंका आणि कसुन रजीता
7/8