आमदार असो की आमदाराचा बाप, सर्वांना नियम सारखाच - अजित पवार

Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे खास आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. कधी काळी ते आपल्या वक्तव्यांनी चर्चेत देखील आले होते. मात्र त्याबाबत दिलगीरी करत बोलताना काळजी घेण्याचा सल्ला सर्वांनाच दिला होता. आता वाहतुकीच्या नियमांवरून अजित पवार यांनी सर्वांनाच कानपिचक्या दिल्या आहेत.

May 01, 2023, 11:16 AM IST
1/6

Ajit Pawar speech

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नेहमीच आपल्या भाषणातून तुफान फटेकेबाजी करताना दिसत असतात. त्यांना ऐकण्यासाठीही अनेक जण उत्सुक असतात. बारामतीमध्ये बोलताना अजित पवार यांनी वाहनचालकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 

2/6

ajit pawar on accident

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महत्त्वाच्या महामार्गांवर अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. मुंबई पुणे एक्स्प्रेसवर गेल्या दोन दिवसांपासून वाहनांच्या अक्षरक्षः लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आपल्या भाषणात बोलताना अजित पवार यांनी याचा उल्लेख केला.

3/6

ajit pawar advise to drivers

समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे एक्स्प्रेस वे या सारख्या महामार्गांवर वेगमर्यादा ओलांडल्याने अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यावरुनच अजित पवार यांनी वाहन चालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

4/6

ajit pawar warning

थोडीशी वेगावर मर्यादा ठेवा ना. पुणे मुंबई हायवे वर ज्या पद्धतीने 100 च्या पुढे गाडी गेल्यानंतर दंड भरावाच लागतो. परस्पर पैसे कापून घेतले जातात.

5/6

ajit pawar angry

एका आमदाराने मला सांगितले की मी इतक्यांदा आलो आणि गेलो की माझे पन्नास हजार तिथेच कापले गेले. आमदार असो किंवा आमदाराचा बाप असो. आमदाराचा बाप म्हटलं की चिडतील. आमदारांचे वडील असते तरी देखील त्यांना नियम सारखेच असते, असे अजित पवार म्हणाले.

6/6

ajit pawar at baramati

अजित पवारांनी आपल्या खास शैलीत बाप म्हटल्यावर त्यांना पुन्हा वडील असा उल्लेख केला आणि उपस्थितीतांमध्ये एकच हशा पिकला. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे बारामतीत बोलत होते.