12 वर्षापूर्वी काय असं घडलं? RCB का सोडली नाही? Virat Kohli म्हणतो...

Virat Kohli loyalty with RCB: मी जेव्हा आरसीबीला (Royal Challengers Bangalore) सांगितलं मला तिसऱ्या क्रमांकावर खेळायचंय, तेव्हा त्यांनी माझं समर्थन केलं, म्हणून मी आज संघासोबत आहे, असं विराटने (Virat Kohli) म्हटलं आहे.

Apr 19, 2023, 21:05 PM IST

Virat Kohli On RCB: टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अनेकदा चर्चेचा विषय असत. सध्या आयपीएलमध्ये (IPL 2023) विराट आपल्या बॅटने आग ओकत आहे. विराट सुरूवातीपासून बंगळुरूच्या संघासोबत खेळत आला आहे. 12 वर्ष झाली तरीही विराटने आरसीबीची साथ (Royal Challengers Bangalore) सोडली नाही, याची अनेकदा चर्चा होताना दिसते. विराटने आरसीबी (RCB) का सोडली नाही? याचं उत्तर त्याने जिओ सिनेमाच्या एका मुलाखतीत दिलं आहे.

1/5

विराटची फेवरेट आरसीबी

आरसीबी माझ्यासाठी महत्त्वाची आहे, कारण लीगच्या पहिल्या तीन हंगामात त्यांनी मला पाठिंबा दिला. मी जेव्हा आरसीबीला सांगितलं मला तिसऱ्या क्रमांकावर खेळायचंय, तेव्हा त्यांनी माझं समर्थन केलं, म्हणून मी आज संघासोबत आहे, असं विराटने म्हटलं आहे.

2/5

विराटला टॉप ऑर्डरमध्ये खेळायंच

दुसऱ्या एका फ्रँचायझीसोबत माझं बोलणं झालं. मला त्यांच्यासाठी टॉप ऑर्डरमध्ये खेळायचे आहे, त्यावेळी त्यांनी माझं ऐकलं नाही, तेव्हा मी पाच किंवा सहाव्या क्रमांकावर खेळायचो, असंही विराट म्हणालाय.

3/5

चाहत्यांनाही वाटेल गर्व

ज्या संघाने माझ्यावर विश्वास दाखवला त्या संघासोबत मला राहायचं होतं, असं विराट कोहली म्हणाला आहे. त्यामुळे आता कोहलीच्या चाहत्यांची कॉलर गर्वाने टाईट झाली आहे.  

4/5

विराटने इज्जत कमावलीये..

त्यानंतर मग जेव्हा मी टीम इंडियासाठी खेळू लागलो आणि शतक झळकावू लागलो, तेव्हा त्याच फ्रँचायझीने म्हटलं की, मी लिलावात यावं. त्यावेळी मी साफ नकार दिला, असा खुलासा देखील विराटने केला आहे.  

5/5

विराट कोहली याचा खुलासा

मी फ्रँचायझीचं नाव घेणार नाही, पण जेव्हा मला त्यांच्या टीममध्ये सामील व्हायचं होतं, तेव्हा त्यांनी माझं ऐकलं नाही. त्यावेळी मी निराश झालो होते, असं विराट कोहली म्हणतो.