230 KM रेंज आणि किंमतही कमी! Maruti देणार Tata ला जोरदार टक्कर; बाजारात येतीये भन्नाट इलेक्ट्रिक कार 'eWX'

मारुती सुझुकीची पालक कंपनी Suzuki ने भारतात आपली नवी इलेक्ट्रिक कार 'eWX' च्या डिझाईनचं पेटंट केलं आहे. टोकियो मोटर शोमध्ये कॉन्सेप्ट कार म्हणून ही सादर करण्यात आली होती.  

May 22, 2024, 15:34 PM IST

मारुती सुझुकीची पालक कंपनी Suzuki ने भारतात आपली नवी इलेक्ट्रिक कार 'eWX' च्या डिझाईनचं पेटंट केलं आहे. टोकियो मोटर शोमध्ये कॉन्सेप्ट कार म्हणून ही सादर करण्यात आली होती.

1/10

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असून टाटा मोटर्स  या सेगमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. अनेक परदेशी कंपन्याही ईव्ही मार्केटमध्ये उतरत आहेत.   

2/10

यादरम्यान लोकांना मारुती सुझुकीच्या इलेक्ट्रिक कारची प्रतिक्षा आहे. ही प्रतिक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे.   

3/10

मारुती सुझुकीची पालक कंपनी Suzuki ने भारतात आपली नवी इलेक्ट्रिक कार 'eWX' च्या डिझाईनचं पेटंट केलं आहे. टोकियो मोटर शोमध्ये कॉन्सेप्ट कार म्हणून ही सादर करण्यात आली होती.  

4/10

Suzuki eWX ची लांबी फक्त 3.4 मीटर आहे. बॉक्सी आणि टॉल ब्वॉय डिझाईनची ही कार Wagon R पासून प्रेरित असल्याचं दिसत आहे. पण आकारात S-Presso पेक्षा छोटी आहे.   

5/10

कंपनीने या कारला कॉन्सेप्ट कार म्हणून सादर केलं आहे. तिचं प्रोडक्शन रेडी मॉडेल अद्याप समोर आलेलं नाही. अशात कारमध्ये काही बदल दिसू शकतात.   

6/10

पेटंट डिझाईन पाहिल्यास यात कर्व्ह विंडशील्ड देण्यात आली आहे. या कारमध्ये बी-पिलर दिसत नाही.  

7/10

कारच्या फ्रंटपासून ते साईड प्रोफाईलपर्यंत क्लँडिंग दिली जात आहे, ज्या चाकांना कव्हर करतात. थोडक्यात हे एस-प्रेसो आणि वॅगन आर प्रमाणे आहे.   

8/10

Suzuki अद्याप कारचे स्पेसिफिकेशन उघड केलेले नाहीत. पण हिला सिंगर मोटर सेटअपसह सादर केलं जाण्याची शक्यता आहे. सिंगल चार्जमध्ये कार 230 किमीची रेंज देईल.   

9/10

मारुतीने अद्याप कारच्या लाँचिंगसंबंधी माहिती दिलेली नाही. आधी कंपनी Maruti eVX ला सादर करेल. यामध्ये 60kWh चा बॅटरी पॅक मिळेल जो 500 किमीची रेंज देईल.   

10/10

Maruti eVX च्या तुलनेत नवी eWX फार छोटी आहे. त्यामुळे तिची किंमतही कमी असेल. बाजारात हिची स्पर्धा थेट Tiago EV शी असेल.