थेट मराठवाड्यात विशेष कॅबिनेट; मुख्यमंत्र्यांनी केल्या मोठ्या घोषणा

मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींचं पॅकेज, नदीजोड प्रकल्पाला 14 हजार कोटींचा निधी जाहीर करण्यात आला. अनेक महत्वाच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या. 

Sep 16, 2023, 23:40 PM IST

Marathwada Cabinet Meeting: मराठवाड्यात विशेष कॅबिनेट बैठक पडली. मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. 

1/7

या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह 29 मंत्री या बैठकीला उपस्थित होते.

2/7

 मराठवाडा वॉटरग्रीडचा ठाकरे सरकारनं खून केला, असा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केला. तर या सरकारनं मराठवाड्याच्या जनतेच्या आशा अपेक्षांचा खून केल्याचा पलटवार अंबादास दानवे यांनी केलाय. 

3/7

 14 हजार कोटींचा निधी नदी जोड प्रकल्पासाठी देण्यात आलाय. 

4/7

सिंचनामुळे 8 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. 

5/7

सिंचनाच्या 35 प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आलीय

6/7

मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटी घोषित करण्यात आलेत.

7/7

मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आलीय.