'कोणी जात विचारली तर..', 'अनेकजण म्हणतात, पगार पुरत नाही, पगार...'; गाडगेबाबांचे 15 प्रेरणादायी विचार

Sant Gadge Maharaj Punyatithi Quotes in Marathi: स्वच्छता, ग्रामसुधार व सामाजिक समतेसाठी आयुष्य वेचणारे थोर संत गाडगेबाबा यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करुन त्यांचे काही खास विचार आजच्या दिवशी नक्कीच वाचले पाहिजेत. असेच काही प्रेरणादायी विचार...

| Dec 20, 2023, 12:18 PM IST
1/16

Sant Gadge Maharaj Punyatithi Quotes in Marathi

अनेकजण म्हणतात, “पगार पुरत नाही.” पगार सरतचं नाही, असे म्हटले पाहिजे. ज्या घरात नवरा-बायको बुद्धिमान, अक्कलवान असतील, तिथे पगार सरत नाही. शिल्लक पेटीत टाकली पाहिजे.

2/16

Sant Gadge Maharaj Punyatithi Quotes in Marathi

कोणी तुम्हाला जात विचारली, तू कोण? तर म्हणावं मी माणूस. माणसाला जाती दोनच आहेत. बाई आणि पुरुष. या दोनच जाती आहेत. तिसरी जातच नाही.

3/16

Sant Gadge Maharaj Punyatithi Quotes in Marathi

तुमच्या देवाचा देवळा पूरता तरी उजेड पडतो का? नाही. मग दिवा विझला, मंडळी दर्शनाला आली, बापूराव दिवा लावा. मग देव कोणी दाखवला? दिव्यानं…! दिवा मोठा की देव मोठा? दिवा…!

4/16

Sant Gadge Maharaj Punyatithi Quotes in Marathi

हवा आहे, लाल आहे, हिरवी आहे, पिवळी आहे, ते समजत नाही आणि त्याचे ठिकाण नाही. असाच परमेश्वर आहे. हे जे तिर्थात देव बसलेले आहेत ना, हे पोट भरण्याचे देव आहेत.

5/16

Sant Gadge Maharaj Punyatithi Quotes in Marathi

डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्या वडिलांना सद्बुद्धी सुचली आणि आंबेडकर साहेबाला शाळेत घातलं. आंबेडकर साहेबांनं काही लहान-सहान कमाई नाही केली. हिंदुस्तानची घटना केली, घटना! अन् तेच शाळेत गेले नसते अन् शिकले नसते तर झाडू मारणंच त्यांच्या कर्मात होतं. विद्या मोठं धन आहे.

6/16

Sant Gadge Maharaj Punyatithi Quotes in Marathi

देव देवळात नाही. देऊळ तयार झालं, मूर्ती आणावी लागते. मूर्ती विकत भेटते. देव विकत भेटतो का? मेथीची भाजी आहे की कादे-बटाटे आहेत? देव विकत भेटतो हेही समजत नाही ज्या माणसाला, तो माणूसचं कसा!

7/16

Sant Gadge Maharaj Punyatithi Quotes in Marathi

गणपती बसवणे देवाची भक्ती नाही. जेव्हा तुम्ही गणपतीला आणता, बँड लावता, भजन लावता आणि वाजवत वाजवत आणता, आणून सिंहासनावर बसवता अन् त्याची पूजा करता. निवद, मोदक, आरत्या आणि शेवटच्या दिवशी उठवता. ज्याची एवढी भक्ती केली, एवढी शोभा केली, ज्याच्या आरत्या केल्या. त्याला पाण्यात बुडवून मारता! तुमच्यावर कधी खटला भरला तर फौजदारी होते. ही देवाची भक्ती नाही. देवाची भक्ती म्हणजे भजन…

8/16

Sant Gadge Maharaj Punyatithi Quotes in Marathi

गाय सुखी, तर शेतकरी सुखी आणि शेतकरी सुखी, तर जग सुखी. म्हणूनच गोपालन, पशुपालन प्रेमाने करा आणि सर्व प्राणिमात्रांवर दया करा. हाच आजचा धर्म आहे.

9/16

Sant Gadge Maharaj Punyatithi Quotes in Marathi

माणसाचे खरोखर देव कोणी असतील तर ते आहेत आईबाप! आई बापाची सेवा करा.

10/16

Sant Gadge Maharaj Punyatithi Quotes in Marathi

ज्या साली लढाई झाली त्या साली एक एक आगबोट 50-50 कोटी रुपयांची पार तळाला गेली. अशा किती आगबोटी बुडाल्या. सत्यनारायण करणाऱ्या महाराजाला म्हणावं, अडीच रुपये घेऊन कशाला एवढी बडबड करता? अडीच लाख रुपये घ्या, अडीच कोटी रुपये घ्या. समुद्राच्या किनाऱ्यावर एक सत्यनारायण करा अन् एक आगबोट वर आणा. हे त्यांना जमणार नाही.

11/16

Sant Gadge Maharaj Punyatithi Quotes in Marathi

माणसाचे धन तिजोरी नाही, सोनं नाही, हिरे नाही, मोटर नाही. माणसाचं धन कीर्ती आहे. चार महिने बरसात परमात्मा देते. मग जमीन पिकते. चार महिने बरसात नाही पडली, तर जमीन पिकेल का? हजारो करोडो लोक मरतील, देवाला आपण फुलं वाहतो. फुलं कोणी पैदा केली? आपल्या आजाने की पंजाने? देवाने केली. मग त्याचीच फुलं, त्याचीच बरसात, आपण त्याचं त्यालाच देतो.

12/16

Sant Gadge Maharaj Punyatithi Quotes in Marathi

दिवाळीला टोपलं भर लाडू केले. घरच्या पोराला खूप खाऊ घाला. पण दोन पोरं गरिबाचे येऊन उभे राहिले, तर त्यांना दोन लहान, दोघाला दोन लाडू द्या.  

13/16

Sant Gadge Maharaj Punyatithi Quotes in Marathi

सरकारने दारूबद्दल उपदेशच करायला नको. पण मुलंच पोलीस झाले पाहिजे. बाप दारू पिऊन सापडला, असा बडवा की बापाच्या बापाने पाहिलं नसेल, असा थंडा करा.

14/16

Sant Gadge Maharaj Punyatithi Quotes in Marathi

देवासाठी पैसा खर्च करू नका. तोच पैसा शिक्षणाला द्या. मंदिराची भर करू नका. जो विद्यार्थी हुशार आहे, तो पैसा त्याला द्या. धर्मकृत्य करण्यासाठी नाही, विद्या घेण्यासाठी पैसा खर्च करा.

15/16

Sant Gadge Maharaj Punyatithi Quotes in Marathi

शाळेहून थोर मंदिर नाही. उदार देणगी शाळेला द्या. भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर, शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ.

16/16

Sant Gadge Maharaj Punyatithi Quotes in Marathi

माय बाबांनो, घरीदारी व गावात नेहमी स्वच्छता ठेवा. मुला-मुलींना शिकवा. अंध, अपंग, अनाथांना यथाशक्ती अन्न, वस्त्र दान करा.