20 मिनिटांत फुल चार्ज! सिंगल चार्जमध्ये 200 Km रेंज देणारी स्पोर्ट्स बाईक

Raptee HV T30 बाईकचे फिचर्स आणि  किंमत जाणून घेऊया. 

| Oct 15, 2024, 22:48 PM IST

Raptee HV T30: ना पेट्रोल संपण्याची कटकट ना मायलेजचं टेन्शन... चेन्नई बेस्ड इलेक्ट्रिक स्टार्टअप Raptee.HV ने जबरदस्त इलेक्ट्रीक बाईक लाँच केली आहे. ही बाईक सिंगल चार्जमध्ये 200 Km रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे.

 

1/7

चेन्नई बेस्ड इलेक्ट्रिक स्टार्टअप Raptee.HV ने जबरदस्त इलेक्ट्रीक बाईक लाँच केली आहे. ही देसी बाईक मार्केटमध्ये असलेल्या बड्या कंपन्यांच्या इलेक्ट्रीक बाईक्सना टक्कर देणार आहे. 

2/7

या बाईकची किंमत 2.39 लाख रुपये आहे.  एक हजार रुपये देऊन ही बाईक बुक करता येवू शकते. 

3/7

 या बाईकची इलेक्ट्रिक मोटर 22kW ची पीक पॉवर जनरेट करते. 30 BHP पॉवर आणि 70 न्यूटन मीटर टॉर्कच्या बरोबरीची आहे. पिकअपच्या बाबतीतही ही बाईक एकमद बेस्ट आहे. 3.6 सेकंदात ही बाईक  0 ते 60 किमी स्पीड पकडते. या बाईकचा  टॉप स्पीड ताशी 135 किमी आहे. 

4/7

ही बाईक स्पोर्टी लूकमध्ये डिजाईन करण्यात आली आहे.  या  बाईकमध्ये स्टायलिश एलईडी हेडलाइटसह, त्यात टचस्क्रीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील देण्यात आला आहे.

5/7

फक्त 20 मिनिटांत ही बाईक फुल चार्ज होते.  सिंगल चार्जमध्ये ही बाईक 200 Km ची रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे.   

6/7

विशेष बाब म्हणजे या बाईकमध्ये युनिव्हर्सल चार्जिंग सिस्टम देण्यात आली आहे. देशभरातील CCS2 कार चार्जिंग स्टेशनवर ही बाईक चार्ज करता येवू शकते.   

7/7

हाय-व्होल्टेज (HV) तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली देशातील ही पहिलीच इलेक्ट्रीक बाईक आहे.