'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पाहा आता 'सी प्लेन'मधून

येत्या काळात पर्यटकांची संख्या वाढणार 

Jun 24, 2020, 15:24 PM IST

Statue of Unity पर्यंत पोहोचण्यासाठी सरकार आता मेगा प्लान तयार करण्याच्या विचारात आहे. उडान योजनेद्वारे प्रादेशिक संपर्क वाढविण्यासाठी १६ समुद्री विमान मार्गांचा वापर करण्यात येणार आहे. 

1/4

सी प्लेन

सी प्लेन

उडान योजनेद्वारे सरकार आता सामान्य पर्यटकांसाठी सी प्लेनची सुरूवात करणार आहे. 

2/4

ऑक्टोबर २०२०

ऑक्टोबर २०२०

अधिकृत निवेदनानुसार  १६ मार्गांमध्ये साबरमती आणि सरदार सरोवर मार्गांचा देखील  समावेश आहे. हा मार्ग स्टॅच्यू ऑफ युनिटीला समुद्री मार्गाने जोडेल. ऑक्टोबर २०२० पासून सी प्लेन या मार्गांवर धावतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

3/4

उडान प्रकल्प

उडान प्रकल्प

केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांच्या मते, साबरमती आणि सरदार सरोवर-नर्मदा मार्गामुळे पर्यटन वाढण्यास मदत होईल. शिवाय पर्यटकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढेल.   

4/4

भारतीय मॉडेल

भारतीय मॉडेल

अमेरिका, कॅनडा, मालदीव आणि ऑस्ट्रेलियाच्या सी प्लेनचा अभ्यास करून भारतीय मॉडेल विकसित करण्याच्या सूचनाही मंडाविया यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.