खरंच इतका स्वस्त मिळतोय 'हा' स्मार्टफोन, काय आहे ऑफर? वाचा

मुंबई : सणासुदीचा हंगाम सुरु असताना OnePlus 10T 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर अनेक ऑफर्स सुरु आहेत. Amazon great Indian Festival Sale 2022 मध्ये भरगच्च डिस्काउंटसह हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.  

Sep 25, 2022, 17:48 PM IST
1/5

OnePlus 10T 5G Display

OnePlus 10T 5G या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच आकाराचा Fluid AMOLED डिस्प्ले उपलब्ध आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याचबरोबर, डिस्पेला Corning Gorilla Glass चं प्रोटेक्शन देखील उपलब्ध आहे. या डिस्प्लचं रेजलूशन 2412 X 1080 पिक्सलचं आहे आणि तो HDR 10+, sRGB, Display P3, 10-bit कलर डेप्थला देखील सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा उपलब्ध आहे.

2/5

OnePlus 10T 5G Performance

OnePlus कंपनीचा हा पहिलाचं स्मार्टफोन आहे ज्यामध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत RAM आणि 256GB चं इंटरनल स्टोरेज मिळतो. हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित असलेल्या OxygenOS वर काम करतो. या स्मार्टफोनला Jade Green आणि Moonstone Black या कलर ऑप्शन खरेदी केलं जाऊ शकतं.  

3/5

OnePlus 10T 5G Camera

OnePlus 10T 5G या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमरा सेटअप उपलब्ध आहे. या स्मार्टफोनचा प्राइमरी कॅमरा 50MP असून या फोनच्या मागच्या बाजूला 8MP अल्ट्रा वाइड कॅमरा आणि 2MP मॅक्रो लेंस उपलब्ध आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16MP पंच-होल कॅमरा मिळतो.

4/5

OnePlus 10T 5G Battery

OnePlus 10T 5G मध्ये 4,800mAh ची बॅटरी दिली आहे. कंपनीने या स्मार्टफोनसाठी 150W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलं आहे. कंपनीच्या मते, 10 मिनटांच्या चार्जिंगमध्ये हा स्मार्टफोन संपूर्ण दिवस वापरला जाऊ शकतो.

5/5

OnePlus 10T 5G Price and Discount Offer

OnePlus 10T 5G हा स्मार्टफोन तीन स्टोरेज वेरिएंट्समध्ये खरेदी करता येतो. या फोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे. तर, 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंट असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 54,999 रुपये असून 16GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 55,999 रुपये आहे. Amazon Big Billion Days Sale 2022 मध्ये या स्मार्टफोनची खरेदी केल्यास SBI कार्डद्वारे 4000 रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट उपलब्ध आहे. याशिवाय, एक्सचेंज ऑफरच्या वापराने या स्मार्टफोनवर 19,250 रुपयांपर्यंतची सुट उपलब्ध आहे. एकुणच, या स्मार्टफोनवर 23,250 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळतो आहे. त्याचबरोबर, 2 दोन हजार 389 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीने ईएमआईद्वारे खरेदी केला जाऊ शकतो.