मनसे 'शून्य'च पण शिवजन्मभूमीत जिंकलेल्या अपक्ष उमेदवाराचं राज ठाकरे कनेक्शन; शिंदेंनी पक्षातून हाकलल्यानंतर..

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या व्यक्तीची निवडणुकीच्या आधी पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र ही व्यक्ती निवडणूक लढवण्यावर केवळ ठाम राहिली नाही तर दणक्यात जिंकून येत त्यांनी शरद पवारांबरोबरच अजित पवारांच्या उमेदवारालाही धक्का दिला. जाणून घ्या कोण आहे हा आमदार आणि त्याचं राज ठाकरेंशी काय कनेक्शन आहे.

| Nov 23, 2024, 16:15 PM IST
1/13

sonavnejunnarwin

तुमचा विश्वास बसणार नाही पण या उमेदवाराने एकट्याच्या जीवावर निवडणूक लढून शरद पवार आणि अजित पवारांच्या उमेदवाराला धूळ चारली आहे. नेमका हा उमेदवार आहे तरी कोण आणि त्याचं राज ठाकरे कनेक्शन काय आहे पाहूयात...

2/13

sonavnejunnarwin

महाराष्ट्रामध्ये महायुतीने दमदार कामगिरी करत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. एक्झिट पोलपेक्षाही महायुतीने उत्तम कामगिरी करत 200 हून अधिक जागांचा टप्पा ओलांडल्याचं पहिल्या सहा तासांच्या मतमोजणीनंतर स्पष्ट झालं आहे. महायुतीच्या या विजयाची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या पुण्यामधील जुन्नर येथे शिवरायांचा जन्म झालेल्या शिवनेरी किल्ला असलेला जुन्नरचा गड चक्क एका अपक्ष उमेदवाराने राखला आहे. 

3/13

sonavnejunnarwin

जुन्नर मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या माजी आमदाराने अजित पवारांबरोबरच शरद पवारांनी दिलेल्या उमेदवाराचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.  

4/13

sonavnejunnarwin

ज्या उमेदवाराबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे शरद सोनावणे! रिक्षा या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढलेल्या सोनावणेंनी किल्ले शिवनेरीचा गड राखला आहे.   

5/13

sonavnejunnarwin

शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असताना शरद सोनवणे यांनी महायुतीत बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. त्यांना मिळालेलं हे यश त्यांच्या स्थानिक लोकप्रियतेबरोबरच 2014 साली आमदार असताना केलेल्या कामांमुळे असल्याची चर्चा जुन्नरमध्ये आहे. या ठिकाणी शरद सोनावणेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अतुल बेनके आणि शरद पवारांच्या पक्षाचे सत्यशील शेरकर यांना पराभूत केलं आहे.

6/13

sonavnejunnarwin

शरद सोनावणेंनी 7 हजार 143 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी एकूण 73 हजार 300 मतं मिळवली आहेत. शरद पवारांचे उमेदवार शेरकर यांनी 66 हजार 157 तर अतुल बेनकेंनी 47 हजार 974 मतं मिळावली आहेत. 

7/13

sonavnejunnarwin

शरद सोनावणे हे मूळचे शिवसेनेचे होते. मात्र तिकीट नाकारल्याने ते 2014 साली मनसेच्या तिकीटावरुन जुन्नरमधून निवडणूक लढले आणि जिंकले होते. त्यावेळेस ते राज्यातील मनसेचे एकमेव आमदार होते.   

8/13

sonavnejunnarwin

मात्र नंतर शरद सोनावणेंना संधी देण्यात आली नाही. ते 2019 पासून कोणत्याही अधिकृत पदावर नव्हते. त्यांनी शिवसेनेमधील पक्षफुटीनंतर शिदेंच्या पक्षाची साथ दिली. त्यांना शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जुन्नर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पद देण्यात आलं होतं.  

9/13

sonavnejunnarwin

शरद सोनावणेंनी रिक्षा हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी घरोघरी अगदी बैलगाडीमधून जाऊन प्रचार केल्याचं पाहायला मिळालं.

10/13

sonavnejunnarwin

मात्र उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असताना अतुल बेनकेंना उमेदवारी दिल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. शरद सोनावणे यांचा येथे दांडगा जनसंपर्क आहे.   

11/13

sonavnejunnarwin

तसेच आमदार असताना केलेली कामंही त्यांची जमेची बाजू असून याच जोरावर त्यांना भरघोस मतदान झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. हा विजय स्थानिकांचा असल्याची भावना येथील जनतेमध्ये आहे.  

12/13

sonavnejunnarwin

यंदाच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेला एकही जागा मिळाली नसली तरी शरद सोनावणेंच्या रुपात राज ठाकरेंच्या माजी आमदाराने बाजी मारल्याचं दिसून येत आहे.  

13/13

sonavnejunnarwin

मतदारांचे आभार मानणारी पोस्ट सोनावणेंनी पोस्ट केली आहे.