4 कोटींचे शेअर्स, 9 किलो सोनं, 121 कोटींची घरं, एकूण संपत्ती...; RSS चा 'हा' श्रीमंत स्वयंसेवक झाला आमदार

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Richest Candidate: महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत या आमदाराचं नाव अव्वल दोनमध्ये आहे. जाणून घ्या नेमका कोण आहे हा आमदार आणि किती आहे त्याची संपत्ती...

| Nov 23, 2024, 14:39 PM IST
1/12

lodha

विधानसभा निकालानंतर एक आरएसएस स्वयंसेवक सध्या राज्यभरामध्ये चर्चेत आहे ते तो त्याच्या विजयासाठी आणि एकूण संपत्तीसाठी...

2/12

lodha

भारतीय जनता पार्टीचे मलबार हिलमधील उमेदवार मंगल प्रभात लोढा यांनी विजय मिळवला आहे. 50 हजारांपेक्षा अधिक मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे.  

3/12

lodha

मंगल प्रभात लोढा यांनी अन्य महत्त्वाची ओळख सांगायची झाल्यास ते लोढा बिल्डर्सचे मालक आहेत. मुंबई आणि उपनगरांमध्ये असलेल्या लोढा बिल्डर्सचे मालक मंगल प्रभात लोढाच आहेत.  

4/12

lodha

मंगल प्रभात लोढा यांची एकूण संपत्ती 447 कोटी रुपये इतकी आहे. त्यांनीच निवडणूक अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये यासंदर्भातील खुलासा केला आहे.  

5/12

lodha

आपल्याकडे 2 लाख 12 हजारांची कॅश असल्याचं लोढांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. लोढांनी सेव्हींग अकाऊंटमध्ये 12 कोटी 7 लाखांहून अधिक रक्कम असल्याचं सांगितलं आहे.   

6/12

lodha

तसेच बॉण्ड्समध्ये 3 लाखांची गुंतवणूक असून शेअर्समध्ये 4 कोटी 4 लाखांची गुंतवणूक असल्याची माहिती मंगल प्रभात लोढांनी दिली आहे.  

7/12

lodha

लोढांनी आपल्यावर 86 कोटी 1 लाख 60 हजारांहून अधिक कर्ज असल्याची माहिती दिली आहे.  

8/12

lodha

14 लाखांची जॅग्वार कार आपल्याकडे असल्याचं लोढांनी म्हटलं आहे. 6 कोटी 76 लाखांहून अधिकचं सोनं आपल्याकडे आहे असं लोढांनी सांगितलं आहे. त्यांच्याकडे एकट्याच्या नावावर 9 किलो 667 ग्राम सोनं आहे. 

9/12

lodha

लोढांकडील एकूण स्थावर मालमत्तेची किंमत 123 कोटी 38 लाख 98 हजार रुपये इतकी आहे.  

10/12

lodha

वेगवेगळ्या इमारती आणि घरांची किंमत 121 कोटी 54 लाखांहून अधिक असल्याचं मंगल प्रभात लोढांनी जाहीर केलं आहे. तर एकूण स्थावर मालमत्ता 125 कोटींची असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.   

11/12

lodha

जोधपूर विद्यापीठामधून आपण एलएलबी आणि बी कॉमपर्यंत शिक्षण घेतल्याची माहिती लोढांनी दिली आहे.  

12/12

lodha

मंगलप्रभात लोढा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकही आहेत.