IPL 2025 मेगा ऑक्शनची वेळ बदलली, फ्रीमध्ये कधी आणि कुठे पाहता येणार?
IPL 2025 Schedule : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. यात जवळपास 577 खेळाडूंवर बोली लागणार असून यात अनेक स्टार खेळाडूंचं भविष्य ठरणार आहे. मात्र ऑक्शन एक दिवसावर आलं असताना बीसीसीआयने ऑक्शनची वेळ बदलली आहे.
1/7
2/7
3/7
प्रत्येक फ्रेंचायझी त्यांच्या संघात 25 खेळाडूंचा सहभाग करू शकतात. संघातील खेळाडूंची किमान संख्या 18 असणार आहे. 10 संघांमध्ये सर्वाधिक 250 खेळाडू असू शकतात यापैकी संघांनी 46 खेळाडूंना रिटेन केलेलं आहे. ज्यामुळे आयपीएल ऑक्शन दरम्यान केवळ 204 स्लॉट्स उपलब्ध आहेत. प्रत्येक संघात जास्तीत जास्त आठ विदेशी खेळाडू असू शकतात, त्यामुळे ऑक्शन परदेशी खेळाडूंसाठी फक्त 70 स्लॉट उपलब्ध आहेत.
4/7
प्रत्येक संघाकडे किती पैसे?
आयपीएलमध्ये प्रत्येक संघाकडे एकूण 120 कोटी असतात. यापैकी काही पैसे हे खेळाडूंना रिटेन करण्यासाठी खर्च केले जातात आणि इतर रक्कम ही मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंना विकत घेण्यासाठी वापरली जाते. पंजाब किंग्स - 110.5 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 83 कोटी रुपये, दिल्ली कॅपिटल्स - 73 कोटी, गुजरात टायटन्स - 69 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स - 69 कोटी, चेन्नई सुपर किंग्स - 55 कोटी, मुंबई इंडियन्स - 45 कोटी, कोलकाता नाइट राइडर्स - 51 कोटी, सनराइजर्स हैदराबाद - 45 कोटी, राजस्थान रॉयल्स - 41 कोटी.
5/7
RTM म्हणजे राइट टू मॅचचा नियम हा सर्वात आधी 2018 मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये लागू करण्यात आला होता. यात जर कोणती टीम त्यांच्या खेळाडूला ऑक्शनपूर्वी रिटेन करू शकली नाही तर या स्थितीत ऑक्शनच्यावेळी त्याला पुन्हा एकदा आपल्या टीममध्ये परत घेण्याची संधी त्यांना मिळेल. परंतु यासाठी त्या खेळाडूवर दुसऱ्या फ्रेंचायझीने जी बोली लावली असेल त्याच रकमेच्या बोलीवर त्यांना त्या खेळाडूला आपल्या संघात घ्यावे लागेल. ही किंमत त्या खेळाडूला मिळालेल्या आधीच्या किंमतीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते.
6/7