Businessman : मुकेश अंबानीपासून गौतम अदानीपर्यंत. भारतातले 'हे' अरबपती किती शिकले आहेत? जाणून घ्या

Jul 12, 2023, 18:24 PM IST
1/5

जगातील टॉप 10  श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा नंबर लागतो. मुंबई अंबानी यांनी मुंबई विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंग केलं आहे. त्यानंतर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत त्यांनी MBA साठी प्रवेश घेतला. पण वडिल धीरुभाई अंबानी यांच्या सांगण्यावरुन मुकेश अंबानी यांनी व्यवसायात लक्ष घातलं. 

2/5

देशातले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती अदानी समुहाचे मालक गौतम अदानी हे कॉमर्समधून पदवीचं शिक्षण घेत होते. पण शिक्षणमध्येच सोडून त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला. सोप्या शब्दात सांगायचं झालं गौतम अदानी कॉलेज ड्रॉपआऊट आहेत. 

3/5

HCL चे फाऊंडर शिव नाडर यांनी अमेरिकेतल्या कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर त्यानी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. शिव नाडर हे इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. 

4/5

पूनावाला समूहाचे संस्थापक अध्यक्ष सायरस पूनावाल हे देसाशते तिसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. महाष्ट्रातल्या कॉलेजमधून त्यांनी काँमर्समधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.

5/5

जिंदाल ग्रुपच्या मालक सावित्री जिंदाल फोर्ब्स अरबपतींच्या यादीत टॉपच्या महिला उद्योगपती आहेत. सावित्री जिंदाल यांनी आसाममधून इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलाय.