राजधानी एक्स्प्रेसपेक्षाही भारी 'वंदे भारत स्लीपर ट्रेन', पहिल्यांदाच समोर आले Inside Photo

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं होतं की, वंदे भारत स्लीपरचा पहिला प्रोटोटाइप तयार असून लवकरच चाचण्या घेण्यात येतील. लांब पल्ल्याच्या मार्गावर चालणाऱ्या नवीन ट्रेन प्रवाशांना राजधानी एक्स्प्रेसच्या तुलनेत स्पीड, सुरक्षा आणि पॅसेंजरना अधिक जलद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. कशी आहे वंदे भारत एक्स्प्रेसची पहिली झलक पाहा. 

| Dec 13, 2024, 14:55 PM IST

Vande Bharat Sleeper Coach Photos: गेल्या काही दिवसांपासून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं होतं की, वंदे भारत स्लीपरचा पहिला प्रोटोटाइप तयार असून लवकरच चाचण्या घेण्यात येतील. लांब पल्ल्याच्या मार्गावर चालणाऱ्या नवीन ट्रेन प्रवाशांना राजधानी एक्स्प्रेसच्या तुलनेत स्पीड, सुरक्षा आणि पॅसेंजरना अधिक जलद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. कशी आहे वंदे भारत एक्स्प्रेसची पहिली झलक पाहा. 

1/7

indian railways vande bharat sleeper coach inside pics new train is better than rajdhani

नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन 180 किमी प्रति तास वेग पकडण्यास सक्षम असून भारतीय रेल्वेने दिलेल्या परवानगीनुसार ट्रेन 160 किमी प्रतितास वेगाने धावेल. राजधानीच्या तुलनेत वंदे भारत अधिक वेगाने धावेल. 

2/7

indian railways vande bharat sleeper coach inside pics new train is better than rajdhani

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या पहिल्या प्रोटोटाइपमध्ये 16 प्रवासी कोच असून यात 11 एसी, 3 टायर कोच,4 एसी आणि 2 टायर कोच आणि एक सिंगल एसी फर्स्ट क्लास कोच आहेत. 

3/7

indian railways vande bharat sleeper coach inside pics new train is better than rajdhani

 वंदे भारत स्लीपरमध्ये भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या दृष्टीने अनेक सुविधा पुरवल्या आहेत. यात नाइट इलुमिनेशन, व्हिजुअल डिस्प्ले या व्यतिरिक्त इंटीग्रेटेड पल्बिक अनाउंसमेट, सिक्युरिटी कॅमेरे, मॉड्युलर पेँटी यासारख्या सुविधा आहेत. 

4/7

indian railways vande bharat sleeper coach inside pics new train is better than rajdhani

नवीन वंदे भारत एक्सप्रेसमध्ये युरोपीय ट्रेनच्या डिजाइन एलीमेंट आहेत. कोचमध्ये अँडव्हास एमिनिटीज दिल्या आहेत. तसंच, आरामदायी प्रवाशांसाठी एक्स्ट्रा पॅडिंग देण्यात आली आहे. अप्पर बर्थवर जाण्यासाठी प्रवाशांसाठी अधिक आरामशीर सुविधा बनवल्या आहेत.   

5/7

indian railways vande bharat sleeper coach inside pics new train is better than rajdhani

नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एअरक्राफ्ट स्टाइल मॉड्युलर बायो वॅक्युम टॉयलेट असणार आहेत. दिव्यांग प्रवाशांसाठी स्पेशल टॉयलेट डिझाइन करण्यात आले आहेत. फर्स्ट क्लास एसी कोचमध्ये टॉयलेटमध्ये गरम पाण्याची सुविधा असणारे शॉवर कम्पार्टमेंट असेल. 

6/7

indian railways vande bharat sleeper coach inside pics new train is better than rajdhani

नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या कोचमध्ये ऑटोमॅटिक इंटरकनेक्टिंग दरवाजे आहेत. त्यामुळं धुळमुक्त वातावरण आणि कुशल एअर कंडिशनिंग देण्यासाठी गॅगवे पूर्णपणे सील करण्यात आली आहे. 

7/7

indian railways vande bharat sleeper coach inside pics new train is better than rajdhani

सध्या ट्रेन आयसीएफ चेन्नईमध्ये असून तिथे क्वालिटी चेक सुरू आहे. येणाऱ्या काही दिवसांत ट्रेनचा फिल्ड ट्रायलसाठी आरडीएसओ पाठवले जाणार आहे. येत्या 2-3 महिन्यात ट्रायल पूर्ण झाल्यानंतर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाण्याची शक्यता आहे.