ऑफिसमध्ये मेहनती कोण आणि नाटकी कोण? 'या' 8 गोष्टींवरुन ओळखा

ऑफिसमध्ये एकाचवेळी असंख्य लोक काम करत असतात. पण काही लोकं कामाचा दिखावा करतात, असा आक्षेप अनेकांचा असतो. पण ही अशी लोकं ओळखायची कशी? तर खालील 8 गोष्टी तुम्हाला ज्या सहकर्मचाऱ्यात दिसतील तो नाटकी असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 

Aug 09, 2024, 21:22 PM IST

ऑफिस ही एक अशी जागा आहे जेथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माणसं अनुभवायला मिळतात. ऑफिसमध्ये आपल्याला खरे मेहनती आणि आळशी अशी दोन प्रकारची माणसं असतात. पण आपण या दोन व्यक्तीमधील फरक कसा ओळखू शकतो. कारण अनेकदा आळशी आणि स्मार्ट लोकं आपल्या नाटकी स्वभावामुळे भाव खावून जातात. अशावेळी खालील 8 गुणांनी तुम्ही अशा लोकांना ओळखू शकता. 

1/8

दाखवणं मोठं पण कृती मात्र लहान

ऑफिसमध्ये असे अनेक सहकर्मचारी असतात जे आपण किती काम करतो याचा दिखावा करत असतात. अशा लोकांचं दाखवणं म्हणजे काम काहीच करत नाही पण दिखावा मात्र भरपूर करतात. आपल्या आजूबाजूला देखील तुम्ही असा अनुभव घेतला असेलच. अशा व्यक्ती काम करताना 100 टक्के उपस्थित नसतात. पण दिखावा मात्र खूप मोठा असतो. 

2/8

लोकांना काम वाटून देणे

ऑफिसमध्ये असे लोक असतात. जे आपलं काम आजूबाजूच्या लोकांना किंवा आपल्या टीम मेंबर्सला वाटून देतात. यामुळे त्यांचं काम अगदी सोप्पं होतं. पण जेव्हा त्याचं यश लाटण्याची वेळ येते तेव्हा मात्र हे लोकं अगदी पुढे असतात. अनेकदा काही लोकं असे असतात जे आपल्याला जमत नाही असं सांगून काम दुसऱ्याकडे सरकवतात आणि आराम करतात

3/8

किरकोळ कामांवर जास्त भर

आपल्या आजूबाजूला अशी लोकं असतात , जे किरकोळ कामांमध्ये जास्त वेळ घालवतात. जसे की, फायलिंग, मिटिंग किंवा काही लोकांशी गाठीभेटी घेणे. या सगळ्यामुळे त्यांचा कामाचा वेळ तर निघून जातो. पण त्याच्यातून आऊटपूट अस काहीच नसतं. या कामांचा दिखावा इतका असतो की, लोकांनाही आश्चर्य वाटतं. 

4/8

कामांना उशीर करणे

ऑफिसमध्ये काही कर्मचारी असतात जे कामांना उगाचच उशीर करतात. यामुळे काम किती कठीण आहे. या कामाने माझा किती वेळ घेतला यासारखा भाव त्यांचा असतो. आपल्या आजूबाजूला अशी लोकं असतात जे उगाचच विनाकारण कामासाठी टाळाटाळ करतात. यातून असा दिखावा असतो की माझा कामात खूप वेळ गेला. 

5/8

नवीन शिकण्याकडे कल नसणे

वर्षानुवर्षे काम करत असणारी लोकं नवीन गोष्ट शिकायला टाळाटाळ करतात. ज्येष्ठ किंवा सिनियर व्यक्तीकडून अशा गोष्टी केल्या जातात तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्या टीममधील लोकांवरही होत असतो. आपण आपल्या जुन्याच कामात इतके व्यस्त आहोत की नवीन गोष्ट शिकू शकत नाही, असा दिखावा केला जातो. 

6/8

आव्हानांकडे करतात दुर्लक्ष

काम म्हटलं की, यामध्ये आव्हान हे येतेच. नवीन आव्हांनांकडे किंवा नवीन गोष्टींकडे सतत दुर्लक्ष केले जाते. यामुळे ही व्यक्ती नवीन काम करत नाही. आणि जुनी कामाची तिच पद्धत तो फॉलो करतो. यामुळे त्याच्या कामात कोणताच बदल होत नाही. 

7/8

सतत तक्रार करणे

काही लोकं काम कमी आणि सतत तक्रारीचा सूर ठेवतात. कारण यांना स्मार्ट वर्क करायचं नसतं. सतत तक्रार करुन वेळ काढून ही व्यक्ती काम चलावूपणा करत असतात. यामुळे कामाकडे दुल्क्ष करतात. एवढंच नव्हे तर यामधून नवीन कोणतीच गोष्ट शिकली जात नाही. 

8/8

संयम नसणे

काही लोकांकडे अजिबात संयम नसतो. हा स्वभाव त्यांना त्याच्या कामातही अडथळा निर्माण करण्यासा कारणीभूत ठरतो. अशावेळी अति उत्साहामुळे कामाकडे दुर्लक्ष होते.