'ही' स्वप्न पाहिल्याने तुमचा भाग्योदय उजळतो, मिळतो श्रीमंत जोडीदार

DREAM ASTRO :  जगात क्वचितच अशी व्यक्ती असेल, ज्याला स्वप्ने पडली नसतील.  प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. 

May 09, 2023, 15:36 PM IST

DREAM ASTRO : अनेकांना बरेचदा स्वप्न पडतात. काही जण स्वप्न बघून घाबरतात. तर काही जण स्वप्न पाहून आपल्या आपल्या विश्वात जगत असतात. दरम्यान, जगात क्वचितच अशी व्यक्ती असेल, ज्याला स्वप्ने पडली नसतील. स्वप्न विज्ञानानुसार, प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. ते भविष्यात घडणाऱ्या सुखद आणि दुःखद घटनांबद्दल सूचित करतात. ही चिन्हे समजली तर माणूस सतर्क राहून जीवन आनंदी करु शकतो. 

1/5

तुम्ही स्वप्नात भक्तिभावाने पूजा करताना दिसले तर समजून घ्या की, देवाने तुमचे ऐकले आहे. लवकरच प्रेमविवाह होणार आहे. जर एखाद्या मुलीने स्वप्नात तिचा नवरा जळत कंदील घेऊन जाताना पाहिला तर असे समजावे की तिचे लग्न श्रीमंत घरातील देखण्या तरुणाशी होईल.

2/5

स्वप्नात बेडूक पाहणे हे प्रेमींसाठी खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ प्रेमात विजय होईल. जर एखाद्या मुलीला आलिशान सुसज्ज हवेली किंवा समारंभात दिसला, तर तिचे लग्न एखाद्या श्रीमंत माणसाशी होईल.

3/5

तुम्ही स्वप्नात स्वतःला मध पिताना पाहिले तर लवकरच तुमचे लग्न होईल आणि तुम्हाला वैवाहिक सुख मिळेल. जर एखादा पुरुष किंवा स्त्री स्वप्नात आपल्या प्रियकरासह बागेत फिरताना दिसली तर त्यांच्या प्रेमाचे भविष्य उज्ज्वल आहे.

4/5

स्वप्न पाहणे गैर नाही. किंवा एखादी गोष्ट स्वप्नात दिसली म्हणून घाबरुन जाऊ नका. बरेच स्वप्न खरं होऊ शकते. जर एखाद्या मुलीने स्वप्नात स्वतःला मित्राने दिलेले ब्रेसलेट घातलेले पाहिले तर तिचे लवकरच लग्न होईल. स्वप्नात एखादे मूल हाक मारताना दिसले, तर समजावे की त्याच्या प्रियकराने दुसऱ्या स्त्रीशीही संबंध प्रस्थापित केले आहेत.

5/5

स्वप्नामध्ये आपण कांदा खाताना दिसलो तर त्याला त्याच्या प्रेयसी किंवा प्रियकराकडून खरे प्रेम मिळेल. जर अविवाहित व्यक्ती मित्राच्या अंत्ययात्रेत सहभागी होताना दिसली तर समजावे की त्याला धनाचा लाभ होईल आणि त्याचे लग्नही निश्चित होईल.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)