Wedding:नवरीला पाठवणीत रडण्याचं प्रशिक्षण दिलं जात, जाणून घ्या

Indian Bride: लग्न म्हटलं की कुटुंबामध्ये लगबग ही आलीच. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आनंद व्यक्त करत सर्वजण नवरी आणि नवरदेवाला शुभेच्छा दिल्या जातात.   तुम्हाला माहितीये, भारतातील एक महिला लग्नाआधी नववधूंना रडण्याचे प्रशिक्षण देते?

Sep 27, 2022, 18:01 PM IST
1/5

भारतात लग्नापूर्वी आणि नंतर अनेक विधी केले जातात. या विधींमध्ये हळद लावणे, बूट लपवणे, अंगठी शोधणे, निरोप समारंभ या सर्वांचा समावेश होतो. निरोपाच्या वेळी, वधू तिच्या कुटुंबातील सदस्यांना भेटते आणि तिच्या वरासह तिच्या सासरच्या घरी निघून जाते.

2/5

कधीतरी वधूचा निरोप पाहून तुम्हीही भावूक झाला असाल. पण तुम्हाला माहीत आहे का की, भारतातील एक महिला लग्नाआधी नववधूंना रडण्याचे प्रशिक्षण देते? हे ऐकून मनाला पटणार नाही, पण हे खरं आहे.

3/5

आजच्या ट्रेंडमुळे, लोक त्यांच्या प्रत्येक गोष्टीबद्दल अधिक संवेदनशील असतात. या भावनेमुळे लोक त्यांच्या फोटोंमध्ये अनेक फिल्टर्स देखील वापरतात आणि ही असुरक्षितता नववधूंना विदाई प्रशिक्षण घेण्यास भाग पाडते. निरोप घेताना रडणं हा समाजाचा भाग झाला आहे.

4/5

मुलींना अनेकदा वैवाहिक जीवनात अनेक प्रकारचे तणाव येतात. तिच्या घरातून बाहेर पडण्यापासून ते नवीन घरात सगळं नीट सांभाळण्यापर्यंत अनेक गोष्टी वधूच्या मनात चालू असतात. या तणावामुळे अनेक वेळा नववधूला निरोप देताना ना रडता येत ना हसता येत. यासाठी राधा नावाच्या महिलेने सात दिवसांचा कोर्स सुरू केला आहे.

5/5

भोपाळमधील महिला संस्थेत लग्न करणाऱ्या मुलींना रडण्याचा अभिनय शिकवला जातो. या महिलेच्या म्हणण्यानुसार, हा कोर्स केल्यानंतर वधू अगदी नैसर्गिकरित्या रडताना दिसते. नववधूंना देखील त्यांच्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये अशा प्रकारे वास्तविकता जोडणं आवडतं.