अराजक बांगलादेशचे सर्वात लाजीरवाणे चित्र! साड्या, ब्लाऊज आणि... शेख हसीना यांच्या निवासस्थानात अशीही लूट

Bangladesh Crisis : आरक्षणाच्या मुद्दयावर बांगलादेशमध्ये जमाव हिंसक झाला आहे. बांगलादेशच्या रस्त्यावर हिंसक आंदोलनं सुरु असून पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून भारतात यावं लागलंय. संतप्त आंदोलकांनी शेख हसीना यांच्या निवासस्थानात घुसून लुटपाट केली. 

| Aug 06, 2024, 19:15 PM IST
1/8

काही लोकांनी शेख हसीना यांच्या निवासस्थानातील अलिशान बेडवर झोपून फोटो काढले. अनेकांनी तिथल्या स्विमिंग पूलमध्ये उड्या मारल्या. तिथल्या अनेक सामनाची नासधूसही करण्यात आली.   

2/8

अराजक बांगलादेशचे सर्वात लाजीरवाणे चित्र! साड्या, ब्लाऊज आणि... शेख हसीना यांच्या निवासस्थानात अशीही लूट

3/8

बांगलादेशात आरक्षणासाठी उभारण्यात आलेलं आंदोलन हिंसक झालंय.  या आंदोलनात सुमारे 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी जीव गमावलाय. आरक्षणाच्या विरोधातून सुरू झालेल्या आंदोलनाचा प्रवास सत्ता बदलापर्यंत झालाय. शेख हसिना यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार होत भारतात पोहचल्यात.  बांगलादेशात लष्कराच्या अधिपत्याखाली आता नवीन सरकार स्थापण्याची तयारी सुरू आहे.  .

4/8

बांगलादेशमध्ये अराजकता पसरली असून आतापर्यंतचं सर्वात लाजीरवाणं चित्र समोर आलं आहे. जमावाने शेख हसीना यांच्या निवासस्थानातून त्यांच्या महागड्या साड्या, ब्लाऊज इतकंच काय तर अंतर्वस्त्रही चोरली. व्हायरल होणाऱ्या फोटोत एक तरुण चक्क महागडी साडी नेसून दिसतोय. 

5/8

या लुटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जमावाने पंतप्रधान निवासस्थानातील खुर्च्या, पंखे, टेबल सोफा, लँपही लुटून नेले.

6/8

याशिवाय पंतप्रधान निवासस्थानातील महागडे पंखे, टीव्ही ट्रॉली बॅग, एसी, इतकंच काय तर बकऱ्या, मासे, गाद्या, उशा आणि भांडीही लोकांनी चोरून नेली.

7/8

व्हायरल होणाऱ्या एका फोटोत एका मुलीच्या हातात महागडी बॅग दिसत आहे. ही मुलगी मोठ्या गर्वाने याचं फोटोसेशनही करताना दिसत आहे. एक महिला तर जिम मशीन वापरताना दिसत आहे. 

8/8

काही लोकांनी शेख हसीना यांच्या निवासस्थानातील अलिशान बेडवर झोपून फोटो काढले. अनेकांनी तिथल्या स्विमिंग पूलमध्ये उड्या मारल्या. तिथल्या अनेक सामनाची नासधूसही करण्यात आली.