ब्रह्मचर्याच्या चौकटीबाहेरचे साधू; शरीरसंबंधांपासून मांसाहारापर्यंत अंगावर काटा आणतंय त्यांचं रहस्यमयी आयुष्य

Aghori Baba : भारत हा एक असा देश आहे, जिथं देशातील आणि परदेशातीलही अनेक तपस्वी वेळ तपश्चर्येमध्ये त्यांचं आयुष्य व्यतीत करतात. 

May 16, 2023, 15:22 PM IST

Aghori Baba : असं म्हणतात, की साधुसंतांचे आशीर्वाद आणि त्यांचे उपदेश तुम्हाला कायम चांगल्या मार्गावर नेतात. अशा या साधुसंतांची एक मोठी आणि वर्षानुवर्षांपासून सुरु असणारी परंपरा भारतात पाहायला मिळते. 

 

1/7

अनुयायांच्या अवतीभोवती

Aghori baba history meaning facts and mystries

काही संत मंडळी त्यांच्या अनुयायांच्या अवतीभोवती असतात. तर, काही साधूंना राजाश्रय मिळालेला असतो. काही मात्र चिटपाखरूही फिरकणार नाही अशा दूरदेशीच्या प्रदेशांमध्ये जीवन व्यतीत करत असतात. 

2/7

जीवनाचं सार शोधत असतात

Aghori baba history meaning facts and mystries

वनांमध्ये म्हणू नका किंवा अंगावर काटा आणणाऱ्या एखाद्या गुहेत म्हणू नका. हे साधू तपश्चर्येचं परमोच्च शिखर गाठून जीवनाचं सार शोधत असतात. कुंभ मेळ्याच्या निमित्तानं ही साधूसंतमंडळी जगासमोर येतात खरी, पण इथंही ते आपल्याच दुनियेत रममाण असतात. 

3/7

काही साधू मात्र याला अपवाद ठरतात

Aghori baba history meaning facts and mystries

बऱ्याचदा म्हटलं जातं की ध्यानधारणेच्या बळावर व्यक्ती त्या वळणावर पोहोचते जिथं त्यांचं तेजस्वी रुप वेगळ्याच लहरी निर्माण करत असतं. पण, काही साधू मात्र याला अपवाद ठरतात.   

4/7

अघोरी बाबा

Aghori baba history meaning facts and mystries

हे साधू म्हणजे अघोरी बाबा. समाजाचा त्यांच्याकडे पाहणयाचा दृष्टीकोन वेगळाच आहे. असं म्हणतात की हे साधू रहस्यमयी आयुष्य जगतात. ते सहसा स्मशानात राहतात. जळती सरणं, तिथलं वातावरण हेच त्यांची साथ देत असतं. रात्रीच्या अंधारात त्यांचा दिवस उजाडतो जेव्हा हे साधू मंत्र-तंत्रांच्या बळावर साधना करतात.   

5/7

साधू म्हणजे ब्रह्मचर्य ...

Aghori baba history meaning facts and mystries

सहसा साधू म्हणजे ब्रह्मचर्य असाच समज असतोपण, हे साधू, अघोरी बाबा मात्र ब्रह्मचर्याच्या चाकोरीतून बाहेर पडत आयुष्य व्यतीत करतात. विवाहबंधनात न अडकता ते महिलांशी संबंध ठेवतात असंही म्हटलं जातं. 

6/7

Aghori baba history meaning facts and mystries

अघोरी बाबांची शंकराची आराधना करण्याची पद्धत आणि त्यांच्या आयुष्यातील रहस्य अंगावर काटा आणतात. त्यांच्या मते शरीरसंबंध हीसुद्धा एक साधनाच.   

7/7

मांसाहाराचं सेवन

Aghori baba history meaning facts and mystries

असं म्हणतात की अघोरी बाबा मांसाहाराचं सेवन करण्याला प्राधान्य देतात तर, अनेकांच्या म्हणण्यानुसार हे अघोरी साधू प्राणी आणि मनुष्याचंही मांस खातात. त्यांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधीत अनेक गोष्टी थरकाप उडवतात.