
गर्भवती महिला डॉ. बनली रुग्णवाहिका चालक, वाचविला तरुणाचा जीव
डॉ. प्रियंका पवार याचं सर्वत्र कौतुक...

ChatGPT मुळे झाला मालामाल! 3 महिन्यात 28 लाखांची कमाई
Lance Junck च्या या ChatGPT Masterclass: A Complete ChatGPT Guide for Beginners या ट्रेनिंग कोर्ससाठी 15 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यातून Lance Junck 34,913 डॉलर ( जवळपास 28.6 लाख रुपये) इतकं प्रॉफिट झालं आहे.

Ram Navami 2023 : शिर्डीमधील रामनवमी उत्सवात मोठी दुर्घटना; यात्रेतील पाळणा निसटून 4 जण जखमी
Ram Navami 2023 : शिर्डीत या रामनवमी यात्रेत पाळण्याचा अपघात झाला. यात्रेतील पाळणा निसटून चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून, इतर तिघांनाही मोठी दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Jitendra Awhad : काळाराम मंदिरात आव्हाडांची धडक; श्रीरामाचरणी ठेवली संविधानाची प्रत
Jitendra Awhad : बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवेशाचा सत्याग्रह केलेल्या काळाराम मंदिरात जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांचा विरोध झुगारून काळाराम मंदिरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या हातात संविधानाची प्रत होती.

122 वर्षांनंतर पुन्हा वेदोक्त मंत्राचा वाद, संयोगिता राजेंना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखलं?
माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या पत्नी संयोगिताराजे यांच्या एका इन्स्टाग्राम पोस्टनं खळबळ माजलीय. संयोगिताराजेंना चक्क वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्यात आलं.

Ajit Pawar : राज्यात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न, अजित पवार यांचा गंभीर आरोप
Ajit Pawar On Riots in Maharashtra : राज्यात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली दंगल सरकारपुरस्कृत असल्याचा मोठा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Ajit Pawar : नपुंसक म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?, अजित पवार यांनी सरकारला सुनावले
Ajit Pawar On Maharashtra Government : सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नपुंसक म्हणाल्यावरुन अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. नपुंसक म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? आम्ही बोललो तर सरकारमधील लोकांना वाईट वाटतं. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नपुंसक म्हटल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू, आईच्या खांद्यावरच ठेवलं डोकं... नाशिकमधली मन सून्न करणारी घटना
पोटात दुखू लागल्याने तरुणाला दुचाकीवरून आई आणि काका त्याला घेऊन रुग्णालयात निघाले. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच तरुणाचा मृत्यू झाला होता. नाशिकमधल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दोन गटांत तुफान राडा, दगडफेकीत दोन पोलीस जखमी
Jalgaon Crime : जळगावमधील पाळधी गावात अद्याप तणावाचं वातावरण आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली आहे. हा वाद वाद्य वाजविण्यावरुन झाल्याचे सांगण्यात येत आहे. वादादरम्यान, दगडफेकीत पोलीस अधिकाऱ्यासह दोन पोलीस जखमी झालेत.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
Chhagan Bhujbal Corona Positive : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झालेय. याबाबत त्यांनी ही माहिती दिली. काल सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

Accident News : जीप आणि दुचाकी अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, दोन चिमुकल्यांचा समावेश
Ahmednagar Accident : अहमदनगर कल्याण महामार्गावर लवणवाडीत येथे भीषण अपघात झाला. जीपने दोन चुकारीस्वारांसह आठ जणांना चिरडले. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोन चिमुकल्यांसह एक महिला आणि पुरुष यांचा मृत्यू झाला. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तीन महिन्यात ही नगरी मंदिराची की गुन्हेगारांची
तीन महिन्यात शहरात १३ खून तर २१ प्राणघातक हल्ले

Gautami Patil : गाडा आला आणि घाटात राडा झाला; इंदुरीकर महाराजांच्या किर्तनात गौतमी पाटीलचे नाव
Gautami Patil : गावागावात लावणीच्या नावानं अक्षरशः धांगडधिंगा सुरू आहे. अलिकडेच अश्लील डान्स कार्यक्रमांच्या आयोजनावरून अजित पवारांनी पदाधिका-यांना खडसावलं होतं. तर आता गौतमी पाटील वर टीका करताना आपली संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचा सल्ला इंदुरीकरांनी दिला आहे.

Nashik Crime : केकचे पैसे मागितल्याने बेकरी मालकावर कोयत्याने वार, जिथे हल्ला केला तिथेच पोलिसांनी धिंड काढली
पुण्यातील कोयता गँगचं लोण आता नाशिक शहरात, किरकोळ कारणावरुन कोयत्याने हल्ला करण्याच्या घटना घडत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.

Uddhav Thackeray : मोदी म्हणजे भारत नव्हे... उद्धव ठाकरे यांची भाजप पक्षावर जोरदार टीका
Uddhav Thackeray : मोदी म्हणजे भारत नव्हे... अशी जाहीर टीका उद्धव ठाकरे यांनी केली. सर्व भ्रष्टाचारी भाजप पक्षात सहभागी झाले आहेत. भाजप हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष झाला आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या चौकशीची काय झाले?

Crime News : दहावीचा पेपर सुटल्यावर घडली भयानक घटना; नाशिकमध्ये दहशत
Nashik Crime News :दहावीचा पेपर संपल्यानंतर एक विद्यार्थी त्याच्या मित्रांसोबत घरी जात होता. यावेळी आठ ते दहा जणांच्या टोळल्याने या मुलावर अचानक कोयत्याने वार केले.

Ahmednagar Accident : ट्रक - टेम्पो अपघातात 4 ठार, तर तीन जणांची प्रकृती गंभीर
Ahmednagar Accident : पुणे अहमदनगर महामार्गावर मध्यरात्री कंटेनर पिकप आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. अहमदनगरच्या कामरगावमध्ये हा अपघात झाला.

Maharashtra Farmer: वांग्याला मिळाला एक रुपये किलोचा भाव; संतप्त शेतकऱ्यांनी केलं असं काही की संपूर्ण बाजार बघत राहिला
Maharashtra Farmer: सध्या कोणत्याच भाजीपाल्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी कमालीचा हैराण झाला आहे. जालना येथील रेणुकाई पिंपळगाव येथील आठवडी बाजारात वांग्यांना केवळ एक रुपया किलोचा दर मिळाला आहे.

...म्हणून आईने पोटच्या मुलीला संपवलं! नाशिकमधल्या चिमुरडीच्या हत्येचं गूढ उकललं... मन सुन्न करणारं कारण
एका अज्ञात महिलेने आईला बेशुद्ध करुन तीन महिन्याच्या मुलीची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने नाशिक हादरलं होतं. या हत्याप्रकरणात आता नवीन खुलासा झाला आहे. चिमुरडीच्या हत्येचं कारण मन सुन्न करणारं आहे.

Yeola Gudi Padwa : शेतकऱ्यांनी चक्क शेतात उभारली अनोखी गुढी
Yeola Gudi Padwa : मराठी नववर्षानिमित्ताने शेतकऱ्याने अनोखी गुढी शेतातच उभारली. पिकाला हमीभाव मिळू दे, अशी या शेतकऱ्याने मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या या अनोख्या गुढीपाडव्याची जोरदार चर्चा होत असून राज्य सरकारने त्यांच्या मागणीचा विचार करावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.