आता इंटरनेटशिवाय 'फेसबुक'वर करा स्टेटस अपडेट

फेसबुकनं आपल्या युझर्सना एक खुशखबर दिलीय. आता इंटरनेट कनेक्शन किंवा कोणत्याही डाटा प्लानशिवाय तुम्हाला फेसबुकवर स्टेटस अपडेट करता येणार आहे.

Updated: Aug 6, 2016, 06:12 PM IST
आता इंटरनेटशिवाय 'फेसबुक'वर करा स्टेटस अपडेट title=

मुंबई : फेसबुकनं आपल्या युझर्सना एक खुशखबर दिलीय. आता इंटरनेट कनेक्शन किंवा कोणत्याही डाटा प्लानशिवाय तुम्हाला फेसबुकवर स्टेटस अपडेट करता येणार आहे.

'फोनेटविश'ची साथ

फेसबुकने 'फोनेटविश' या कंपनीशी केलेल्या करारामुळे हे शक्य झालं आहे. 'फोनेटविश' ही अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंट्री डेटा आधारीत संवाद सेवा आहे. ही कंपनी डेटा कनेक्शनशिवाय अॅप्लिकेशन कार्यरत करण्याचे काम करते. त्यामुळे यापुढे स्टेटस अपडेट करण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची गरज नाही.

डाईल करा *325#
तुमच्या फोनवर *325# हा नंबर डायल करून तुमचं फेसबुकचं युझरनेम आणि पासवर्ड टाइप करा. यानंतर तुम्हाला फेसबुक इंटरनेटशिवाय वापरता येईल.

पण फेसबुकवर पोस्ट टाकण्यासाठी, नोटिफिकेशन्स बघण्यासाठी किंवा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यासाठी दिवसाला एक रूपया नक्की खर्च करावा लागेल. फक्त एका रूपयात तुम्हाला दिवसभरात फेसबुकचा अमर्यादीत वापर करता येईल.

सध्या ही सेवा एअरटेल, एअरसेल, आयडिया आणि टाटा डोकोमो या नेटवर्क ऑपरेटर पुरतीच मर्यादीत आहे. पण लवकरच इतर नेटवर्क युझर्सनाही याचा लाभ घेता येऊ शकेल.