मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा तडकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला लालाजी म्हणतो... पण तो लालाजी का म्हणतो याचं उत्तर वीरेंद्र सेहवागने आपल्या खास शैलीत दिले आहे.
वीरेंद्र सेहवागला सचिन तेंडुलकरने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर वीरूने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला
.@sachin_rt pic.twitter.com/yp0XCHINVB
— Virender Sehwag (@virendersehwag) October 20, 2016
एक व्हिडीओ पोस्ट करून सेहवाग म्हणाला, ''थॅक्यू गॉड जी, तुम्ही विचार करत असाल 'गॉड जी' मला लाला का बोलतात. पहिली गोष्ट म्हणजे मी 'लाला' (उत्तर भारतात लाला हा शब्द मुख्यतः व्यापा-यांसाठी किंवा वाणी समाजासाठी वापरला जातो) सारखा दिसतो. ज्याप्रमाणे ते लठ्ठ असतात तसा मी दिसतो. दुसरं कारण म्हणजे मी क्रिकेटच्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो. म्हणजे, किती धावा झाल्या, किती चौकार, षटकार मारले. कोणी कुठे काय केलं. किती वेळेस सचिन तेंडुलकरसाठी मी धावलो. कदाचित म्हणूनच ते मला 'लाला' म्हणतात असं मला वाटतं. 'गॉड जी' ला काय वाटतं ते सचिन स्वतः सांगेल''.